राज्यात उष्णतेने कहर केला आहे. उष्णतेपासून बचाव व्हावा यासाठी नागरिक अनेक पर्याय निवडत आहेत. उन्हाळ्यात सर्वात जास्त पसंती ही आईसक्रीमला असते. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत आईसक्रीम खाल्ली जाते. मात्र अनेकदा यातून आरोग्यास धोका निर्माण झाल्याच्या बातम्या आपण वाचतो.
अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. एका वयस्कर आईबाईला आईसक्रीम खाणं चांगलचं महागात पडलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हि घटना खरपुडी, तालुका खेड येथे घडली आहे. कुलाबाई गुलाब रेटवडे (वय ५५ रा. रेटवडी ता. खेड ) या वृद्ध महिलेचे नाव आहे. रेटवडे या आईसक्रीम खाण्यासाठी मंडपाच्या बाहेर गेल्या होत्या. तिथे चोरट्यांनी त्यांचे दागिने लंपास केले.
त्यानंतर या महिलेने खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द फिर्याद दिली आहे. पोलिस या प्रकरणी चोरट्यांचा शोध घेत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि २७ रोजी बुधवारी ही घटना घडली आहे. या घटणेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाबाई रेटवडे या बुधवारी खरपुडी बुद्रुक येथे पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाकरीता गेल्या होत्या. पुण्यस्मरणानिमित्त किर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर जेवण करून रेटवडे या आईसक्रीम खाण्यासाठी मंडपाच्या बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांनी हात साफ केल्याच पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी किर्तन संपल्यामुळे लोकांची गर्दीचा जमली होती. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांने रेटवडे यांच्या गळ्यातील ६८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरले. त्यानंतर घाबरलेल्या रेटवडे यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
विराट कोहलीच्या एक्स गर्लफ्रेंडने केला मोठा खुलासा; रागात नको ते गेली बोलून…
एक-दोन नव्हे तर सहा अभिनेत्रींसाठी धडधडत होते शम्मी कपूरचे हृदय; मुलगा आदित्यने उघडली अनेक गुपिते…
सरकारच्या आदेशाला बगल देत हिंदू संघटनेने मंदिरांवर लावले भोंगे, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
ज्या चोरांनी पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली त्याच चोरांसोबत पोलिसांची मटन पार्टी