Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. सध्या नागपूर ते चंद्रपूर मार्गावर ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या जल्लोषात मनसे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी राज ठाकरे ऍक्टिव्ह झाल्याचे दिसते. परंतु याच दौऱ्या दरम्यानचे एक मोठे अपडेट समोर येत आहे. मनसेच्याच पदाधिकाऱ्यांविरोधात महिलांनी राज ठाकरे समोर आंदोलन केले.
राज ठाकरे चंद्रपुरात पोहोचले असताना ते ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये थांबले होते. त्या हॉटेलखाली आंदोलन करत काही महिलांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांची फसवणूक केल्याचा दावा केला. कलकाम नावाच्या कंपनीने त्या महिलांची फसवणूक केली. मात्र त्या कंपनीला मनसे पदाधिकारी वाचवत आहेत, मदत करत आहेत.
सामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीला मदत करणाऱ्या स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना पक्षातून हाकलून द्यावे. पक्षाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या महिलांनी राज ठाकरेंकडे केली. राज ठाकरेंनी आंदोलन करणाऱ्या महिलांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
संबंधित कंपनी आणि त्या कंपनीला मदत करणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करू, दोषी असणाऱ्यांना जाब विचारला जाईल, असे आश्वासन देत राज ठाकरेंनी या महिलांची समस्या दूर केली. या प्रकरणाबाबत लक्ष घालण्याचे काम अविनाश जाधव यांच्यावर सोपवण्यात आले आहे.
दरम्यान राज ठाकरेंनी तब्बल नऊ वर्षांनी चंद्रपुरला भेट दिली. नागपूर ते चंद्रपूर दरम्यान ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे स्वागत केले. ‘आमचे साहेब आले, आमचे दैवत आले’ असे फ्लेक्स रस्त्यांवर ठिकठिकाणी झळकले.
येत्या महानगरपालिका निवडणुका तसेच पुढील काळातल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेत मनसे पक्षाला नवी ऊर्जा देण्यासाठी राज ठाकरे आता सज्ज झाल्याचे दिसते. कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून काढण्यासाठी राज ठाकरे राज्याच्या विविध भागांमध्ये सभा घेत आहेत. दौरे करत आहेत. विदर्भ दौऱ्यावर असताना घडलेल्या वरील प्रसंगाची मात्र राज्यामध्ये सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Dussehra gathering : शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी द्यावी, कारण..; मनसेने केली मागणी
Sharad Pawar : पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टर शरद पवारच; गंभीर आरोप करत चौकशीची मागणी
Kohinoor diamond: कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथांचा! हिरा इंग्लंडकडून परत आणा, राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी