मल्याळम अभिनेता आणि निर्माता विजय बाबूवर (Vijay Babu) कथितरित्या लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला आहे. केरळ पोलिसांनी एका महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर विजय बाबूविरोधात खटला दाखल केला आहे. तसेच विजयविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केला आहे. या तक्रारीत महिलेने विजय बाबूवर अनेक गंभीर आरोप लावले आहेत.
बातम्यानुसार, पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले की, जेव्हा ती सिनेसृष्टीत नवीन होती तेव्हा विजय बाबूने एक चांगल्या मित्राप्रमाणे तिची काळजी घेतली. तिला मार्गदर्शन दिले. पण यादरम्यान विजय तिचा लैंगिक शोषण करत राहिला. तसेच जेव्हा ती शारीरिक संबंधासाठी नकार द्यायची तेव्हा विजय बाबू तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचा. जवळपास दीड महिने तो तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवला.
पीडित महिलेने तक्रारीत पुढे म्हटले की, विजय बाबू तिला अनेकदा ड्रग्ज द्यायचा किंवा दारू पाजायचा. यामुळे तिला गुंगी यायची. यानंतर तो तिचा लैंगिक शोषण करायचा. पीडित महिलेचे म्हणणे आहे की, विजय बाबू तिच्यासाठी एक राक्षस आहे. त्याने केवळ लग्न आणि चित्रपटात भूमिका मिळवून देण्याचे आश्वासन देऊन तिचा लैंगिक शोषण केला.
तक्रारदार महिलेने असाही आरोप केला आहे की, विजय बाबूने तिचा शारीरिक छळ केला. तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तसेच जर याबाबत कोणाला सांगितल्यास तर तिचा खासगी व्हिडिओ सार्वजनिक करेल, अशी धमकीही विजय बाबूने दिल्याचे महिलेने म्हटले आहे.
दरम्यान, विजय बाबू मल्याळम सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. अभिनयासोबत तो चित्रपटांची निर्मितीही करत असे. विजय बाबूची ‘फ्रायडे फिल्म हाऊस’ नावाची स्वतःची एक निर्मिती संस्थासुद्धा आहे. निर्माता म्हणून त्याला अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणात विजय बाबूने मंगळवारी रात्री फेसबुकवर लाईव्ह येत त्याची बाजू मांडली. विजय बाबूने म्हटले की, ‘मी कोणतीही चूक केली नाही त्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही. मला ‘मी टू’ आरोपासंबंधित देशातील कायदे माहित आहेत. मी महिलेच्या नावाचा खुलासा करत आहे. या महिलेच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे. तसेच मी मानहानीचा खटलासुद्धा दाखल करणार आहे. मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याजवळ सर्व रेकॉर्ड्स आहेत’.
महत्त्वाच्या बातम्या :
..त्यामुळे मराठी चित्रपट १०० कोटींच्या घरात जायला वेळ लागणार नाही, चिन्मय मांडलेकरने व्यक्त केला विश्वास
भररस्त्यात किन्नरांनी अडवून फोटो काढल्यानंतर अशी होती अदा शर्माची रिऍक्शन; पहा व्हिडीओ
भावाला गमावल्यानंतर आता रवी किशन यांच्या आईला झालाय कॅन्सर; दु:ख व्यक्त करताना म्हणाले,…