विराट कोहलीच्या फॉर्ममुळे त्याचे सर्व चाहते आणि क्रिकेट जाणकार चिंतेत आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये गेल्या शतकापासून विराटने आतापर्यंत एकही शतक झळकावलेले नाही, तर त्याच्या शतकाची प्रतीक्षा आता अडीच वर्षांहून अधिक काळ लोटली आहे. पण कालच्या मॅचमध्ये विराटने 54 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली. त्यानंतर त्याने त्याच्या खेळीचं रहस्य सांगितले.
नुकतीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या शेवटच्या लीग मॅचमध्ये विराटला सूर गवसला. विराटनं गुजरात टायटन्स विरुद्ध 54 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली. विराटच्या या खेळीच्या जोरावर आरसीबीनं गुजरातचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे स्पर्धेतील आव्हान अद्याप कायम आहे. या सिझनमध्ये खराब फॉर्ममुळे झगडणाऱ्या विराटसाठी हे अर्धशतक महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की, त्याचं या सिझनमध्ये हे दुसरंच अर्धशकत असून सर्वोच्च धावसंख्याही आहे. या सामन्यात केलेल्या परफॉर्मन्सवर विराटने मॅच झाल्यानंतर आपल्या खेळीबद्दल मत व्यक्त केले.
म्हणाला, मी काल 90 मिनिटे नेटमध्ये घालवली. मी तिथं सर्व प्रकारच्या बॉलचा अभ्यास केला. त्यामुळे मी आज निश्चिंत होतो. आत्तापर्यंत काय झालं याचा विचार मी केला नाही. माझ्याबरोबर हे 2014 साली देखील झालं होतं. पण मी त्याची तक्रार करणार नाही असे विराट म्हणाला.
तसेच म्हणाला, मी कधी टीमच्या बाहेर गेलो तर कधी टीमला मॅच जिंकून दिली आहे. माझं काम टीमसाठी चांगलं योगदान देणे हे आहे. मी मोहम्मद शमीचा पहिला बॉल खेळला तेव्हाच आजचा दिवस खास असल्याचं मला वाटलं. मी लेन्थ बॉल खेळू शकतो असं मला वाटतं. मला माझ्या शॉट्सवर विश्वास ठेवला पाहिजे हे माहिती होते.
विराट कोहली म्हणाला, ही मॅच आमच्यासाठी महत्वाची होती. मी टीमला दोन पॉईंट दिल्याबद्दल खुश आहे. तुम्ही फक्त योग्य भूमिकेतून काम केलं पाहिजे. इतकी वर्ष खेळल्यानंतर अपेक्षा असणारच आणि त्या पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. या संपूर्ण सिझनमध्ये मला कोणताही पश्चाताप किंवा तक्रार नाही कारण मला नेहमीच फॅन्सचं प्रेम मिळालं असंही विराट कोहली यावेळी म्हणाला.