Share

कश्मीरमधून कलम ३७० हटवल्याचा सर्वात जास्त फायदा ‘या’ प्रेमीयुगुला इतका कुणालाच झाला नसेल

कलम ३७० जम्मू काश्मीरच्या विकासासाठी हटविण्यात आले असले तरी त्याचा फायदा प्रेमी युगलांना होताना दिसत आहे. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यामुळे एका भारतीय जवानाला त्यांची प्रियसी भेटली आहे. या दोघांनी आता लग्न करुन आपल्या नवीन संसाराला सुरुवात केली आहे. यावेळी या दोघांनी ३७० कलम हटवल्यामुळे केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पाटील हे एक भारतीय जवान असून त्याचे मुळ गाव कराड तालुक्यातील उंडाळे आहे. ज्यावेळी अजित काश्मीरमध्ये कार्यरत होते. तेव्हा त्यांची ओळख जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या सुमन नामक मुलीसोबत झाली होती. अजितला सुमन पहिल्या भेटीतच आवडली होती. त्यामुळे या दोघांमधील भेटीगाठी ही वाढू लागल्या होत्या.

यानंतर हे दोघे २०२० मध्ये काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. मात्र यावेळीच कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अजित यांना नाईलाजाने सुमनच्या घरी तब्बल दहा दिवस राहावे लागले. याचा फायदा या दोघांना झाला.

अजित सुमनच्या घरी राहिल्यामुळे त्यांची ओळख सुमनच्या घरच्यांशी झाली. सुमनच्या घरच्यांनी देखील अजितला जवळून पाहिले. तसेच त्याला समजून घेतले. याकाळात सुमन आणि अजितचे नातेही आणखीन मजबूत झाले. सुमनच्या घरच्यांना अजित आवडू लागल्यामुळे त्यांनी सुमनच्या लग्नाचा प्रस्ताव अजित समोर ठेवला.

तसेच त्याला सुमनसोबत लग्न करण्याची विनंती केली. अजितलाही सुमन आवडत असल्यामुळे त्याने हा प्रस्ताव स्विकार केला. यानंतर सुमनच्या घरच्यांनी दोघांचे लग्न २७ नोव्हेंबरला काश्मीरमध्ये लावून दिले. यावेळी अजितच्या घरच्यांना व्हिडीओ कॉलद्वारे सहभागी करण्यात आले.

सध्या अजित आपल्या पत्नीला घेऊन पुन्हा कराडला आला आहे. यावेळी त्याने म्हटले आहे की, जर कलम ३७० अद्याप काश्मीरमध्ये लागू असते तर मला सुमनकडे राहता आले नसते. हे कलम हटवल्यामुळे आम्हाला याचा खूप फायदा झाला आहे. आम्ही यासाठी केंद्र सरकारचे आभार मानतो.

महत्वाची बातमी
खेळायच्या वयात मुंबईच्या मुलाने उभी केली करोडोंची कंपनी, २०० जणांना दिल्या नोकऱ्या, वाचा यशोगाथा
पैसा कमवण्यासाठी दुखापत झालेले खेळाडू देखील IPL वेळी फिट होतात; रवी शास्त्रींचा थेट निशाणा
….म्हणून बेळगाव सीमाप्रश्न अस्तित्वातच नाही, हा वाद कधीच संपलाय; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं अजब तर्कट
बाळासाहेबांचा तो नियम पाळत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का? वाचा काय आहे तो नियम

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now