Share

wine discision: शिंदेगट म्हणतोय मॉलमध्ये वाइन विक्री शेतकऱ्यांच्या हिताचीच, आता फडणवीस काय भूमिका घेणार?

liquor

wine discision: जुलै महीन्यात राज्यात ठाकरे सरकार जाऊन नवीन सरकार स्थापण झाले. शिंदे – फडणवीसांचे हे सरकार आल्यापासून राज्यात नवनवीन निर्णयांचा धडाका सुरू आहे. त्यासोबतच ठाकरे सरकारचे अनेक जुने निर्णय रद्द केले जात आहेत. स्वत: एकनाथ शिंदेंच्या खात्याने घेतलेले निर्णयही ह्या सरकारने रद्द केले आहेत.

परंतू आता मात्र एका बाबतीत शिंदे सरकारने ठाकरे सरकारचेच धोरण पुढे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारने राज्यातील किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. हेच धोरण पुढे चालु ठेवण्याचे संकेत आताच्या शिंदे -फडणवीस सरकारमधील  उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहेत.

उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, राज्यातील मॉलमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यात शेतकऱ्यांचाच फायदा होणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापण झालेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या फायद्याचाच निर्णय घेणार आहोत.

मागील सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यानंतर याबाबत जनतेकडून प्रतिक्रीया मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बऱ्याच लोकांनी मद्यविक्रीस परवानगी द्यावी असा कौल दिला आहे. तरीही आम्ही अजून अभ्यास करून निर्णय घेऊ असे त्यांनी सांगीतले. तसेच हा निर्णय भाजप नेत्यांनाही पटवून देऊ असेही ते म्हणाले.

गेल्यावेळी ठाकरे सरकारने राज्यातील किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेताच भाजप नेत्यांनी त्याविरोधात रान उठवले होते. संपुर्ण राज्यात आंदोलन करत मविआ म्हणजे मद्य विक्री आघाडी अशी घणाघाती टिका केली होती. तसेच मद्यनिर्मीती करणाऱ्या कंपन्यांकडून मविआच्या नेत्यांना पैसे पुरवले गेलेत असा गंभीर आरोपही केला होता.

मात्र आता भाजप सहभागी असलेले सरकारच या मद्यधोरणाला पाठींबा देण्याचा निर्णय घेत असल्याने त्यावेळी विरोध करणारे भाजप नेते तोंडघशी पडले आहेत. आता कुठल्या तोंडाने या धोरणाचे समर्थन करायचे हा सवाल त्यांच्यापुढे उभा राहीला आहे. आता विरोधात असणारी मविआ ह्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांना कोंडीत पकडणार हे निश्चीत आहे.

यासंदर्भात भाजप आमदार राम कदम यांना प्रतीक्रीया विचारली असता ते संतापले. ते म्हणाले की ध चा मा करू नका. अजून यावर निर्णय झाला नाही. अभ्यास करून निर्णय घेऊ असे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई म्हणाले आहेत. यावरून असे लक्षात येते की ह्या निर्णयामुळे भाजप नेत्यांपुढे चांगलेच संकट उभे राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या
eknath shinde : एकनाथ शिंदेंना दररोज सलाईन लावली लागते; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Shinde Group : …तर आम्ही उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू पण ‘या’ अटीवर; शिंदे गटाची ठाकरेंना जाहीर ऑफर
Shambhuraj Desai : काहीही झालं तरी गद्दार शंभुराज देसाईंना पाडणारच; शिवसेनेच्या वाघाने फोडली डरकाळी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now