Share

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवण्यासाठी वशीला..; प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने उघड केले सत्य

६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आणि मराठी सिनेसृष्टीत नवा उत्साह संचारला. ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. तर किशोर कदम यांच्या गोदाकाठ आणि अवांछित यांना सर्वोत्कृष्ट ज्युरी पुरस्कार जाहीर झाला आहे. (win National Film Award..; The famous Marathi director revealed the truth)

त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत सध्या सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. यातच गोष्ट एका पैठणीची सिनेमाच्या दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गोष्ट एका पैठणीची या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावर दिग्दर्शक शंतनु रोडे म्हणाला की, ‘हा माझ्या करियरमधला माझ्या सिनेमाला मिळालेला पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्यामुळे मी निशब्द झालो आहे.’

पुढे तो म्हणाला की, ‘माझ्या तिन्ही सांजा, जयजयकार या चित्रपटांनाही पुरस्कार मिळाले आहेत. परंतु गोष्ट एका पैठणीची या माझ्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला.’

मला वाटायचे की, ‘राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यासाठी वशिला लागतो. त्यामुळे पुरस्काराची अपेक्षा करण्यात अर्थ नाही. परंतु आता समजत आहे की, यात तथ्य नाही. माझ्या अनेक चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत.तुम्हाला तुमच्या कामाचं नाणं खणखणीत वाजवावं लागतं, तेव्हा त्याची दखल घेतली जाते.’ अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

गोष्ट एका पैठणीची ही प्लॅनेट मराठीची निर्मिती आहे. शंतनु रोडे दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य भूमिकेत सायली संजीव आणि सुव्रत जोशी हे कलाकार आहेत. अक्षय बर्दापूरकर याची निर्मिती असलेल्या या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचा मान पटकावला आहे.

महत्वाच्या बातम्या-
बंडखोर संतोष बांगरांचा खेळ खल्लास; विधानसभेला पराभूत करण्यासाठी तगडा नेता शिवसेनेत
शिवसेनेने आगामी निवडणूका स्वबळावर लढवाव्यात; बंडानंतर राज्य पिंजून काढणाऱ्या बड्या नेत्याची मागणी
करिअरमधील तिसरा नॅशनल अवॉर्ड जिंकताच अजय देवगणने सांगितली ही गोष्ट, म्हणाला…

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now