कॉमेडीच्या बाबतीत भारती सिंगला(Bharati Singh) तोड नाही. लोकं तिला खूप पसंत करतात. पण काही वेळा ते विनोदाने अशी कृत्ये करतात की ते लोकांच्या निशाण्यावर येतात. लेटेस्ट प्रकरण म्हणजे तिचा मुलगा लक्ष याच्या त्या फोटोचं, ज्यात तिने त्याला अरबस्तानच्या शेखसारखा ड्रेस घातला आहे आणि त्याच्या शेजारी हुक्का ठेवला आहे.(will-you-make-ganjedi-from-childhood-bharti-singh-shared-baby-photo)
अनेक सोशल मीडिया युजर्स लक्षच्या या लूकला क्यूट म्हणत आहेत, तर अनेकजण हुक्क्यामुळे भारती सिंगला ट्रोल करत आहेत. भारतीने लक्षचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ”हॅपी संडे लक्ष लिंबाचिया”. यासोबत तिने हार्टचे इमोजी आणि गणपती बाप्पा मोरया, गोला, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया असे हॅशटॅग शेअर केले आहेत.
फोटोसह लक्षची(laksh) स्टाईल करण्याचे श्रेय भारतीने सेलिब्रिटी स्टायलिस्ट डिंकी निर्थ यांना दिले आहे, यांना असिस्ट करण्यासाठी लताशा मालवणी आणि फोटोशूटसाठी बेबी फोटोशूट फोटोग्राफर तरवीन यांना क्रेडिट दिले आहे.
भारतीचा फोटो शेअर होताच सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यावर एका सोशल मीडिया यूजरने कमेंट करत विचारले आहे की, “बाकी सर्व काही ठीक आहे, कोणत्या आनंदात हा हुक्का ठेवला आहेस भाऊ?” एका यूजरने कमेंट केली की, “बाळ खूप गोंडस दिसत आहे. पण थीम आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. माफ करा ही चांगली गोष्ट नाही.”
एका युजरने शिवीगाळ करत लिहिले की, “हे काय बकवास आहे? तुम्ही त्याला मुस्लिम बाळासारखे कपडे घातले आणि गणपती बाप्पा लिहित आहात? सिरीयसली? तुम्ही आमच्या धर्माचा अपमान केला आहे.” एका युजरने विचारले आहे की, “लहानपणापासून तू याला गंजेडी बनवशील का?”
भारती सिंगने(Bharati Singh) 3 डिसेंबर 2017 रोजी कॉमेडी सीरियल्सचे स्क्रिप्ट राइटर हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. त्यांच्या मुलाचा जन्म 3 एप्रिल 2022 रोजी झाला. भारती आणि हर्ष प्रेमाने मुलाला गोला म्हणतात. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारती आणि हर्षने पहिल्यांदाच गोलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला. तसेच त्यांच्या मुलाचे नाव लक्ष असल्याचे सांगितले.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर भारती आणि हर्ष शेवटचे कॉमेडी शो ‘खतरा खतरा खतरा’मध्ये दिसले होते. ज्याचा तिसरा सीझन 20 मे 2022 रोजी पूर्ण होत आहे.