भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आज म्हणजे १२ जुलैपासून सुरू होत आहे. मात्र मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात सहभागी होणार नाही. मात्र, दुसऱ्या वनडेपर्यंत विराट कोहली पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Virat Kohli, Rishabh Pant, Shreyas Iyer, Rohit Sharma)
बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहलीला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. विराट कोहलीच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून कोणतेही अपडेट जारी करण्यात आलेले नाही. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, विराट कोहलीची दुखापत गंभीर नाही.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली प्लेइंग ११ चा भाग नसल्याचा दावा वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात केला आहे. वृत्तात असे म्हटले आहे की, १४ जुलै रोजी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडेपर्यंत विराट कोहली पूर्णपणे तंदुरुस्त होईल. इग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने ५५ चेंडूत ११७ धावांची शानदार खेळी केली. सूर्यकुमार यादव पहिल्या वनडेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसतो.
टीम इंडियाकडे श्रेयस अय्यरचाही पर्याय आहे. मात्र, अय्यर पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. इंग्लंडविरुद्ध खेळली जाणारी ही मालिका विराट कोहलीसाठी फॉर्ममध्ये परतण्याची उत्तम संधी आहे.
त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही या शर्यतीत सामील होऊ शकतो. पंत भारतीय संघात चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. मात्र, पंत हा स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्यामुळेच कर्णधार रोहित शर्माने त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ओपनिंगसाठी चान्स दिला. अशा स्थितीत फलंदाज ऋषभ पंतची शैली पाहता कर्णधार रोहित शर्मा त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोहलीला पर्याय म्हणून ठेवू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
या तीन खेळाडूंनी विराट कोहलीसाठी खोदला खड्डा, खराब फॉर्ममुळे होणार संघातून हकालपट्टी
तर विराट कोहलीची वर्ल्ड कपच्या संघातून होऊ शकते हकालपट्टी, चाहत्यांना बसू शकतो धक्का
..तर तुम्ही खूप भाग्यवान आहात, विराट कोहलीच्या समर्थनार्थ उतरला हा इंग्लिश गोलंदाज
तरच तो फॉर्ममध्ये येऊ शकतो, सुनील गावसकर यांनी पकडली विराट कोहलीची कमजोरी