Share

विराट कोहलीला मिळणार संघातून डच्चू? सततच्या खराब फाॅर्ममुळे पहील्यांदाच आली ही वेळ

भारतीय प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली याच्यासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विराट कोहलीच्या सातत्याच्या खराब फॉर्ममुळे असे वाटत आहे की टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याला बाहेर केले जाऊ शकते. सध्या या माहितीमुळे क्रिकेट जगतात आणि चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

माहितीनुसार, आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीने 7 सामन्यात 20 पेक्षा कमीच्या सरासरीने 119 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट देखील 130 पेक्षा कमी आहे. असे नाही की विराट कोहली फक्त आयपीएलमध्ये अपयशी ठरत आला आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील त्याचं हेच चित्र दिसते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील विराटने अखेरचे शतक हे 2019 मध्ये केले होते. त्याच्या या सातत्याच्या खराब फॉर्ममुळे अशी चर्चा होतयं की टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून विराटला बाहेर केले जाऊ शकते. सोशल मीडियावर देखील या मुद्यावरून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

चार वर्षा पूर्वी म्हणजेच 19 एप्रिल 2019 रोजी कोलकाताच्या इडन गार्ड्न्स मैदानावर आरसीबी आणि केकेआर यांच्यात लढत झाली होती. या सामन्यात विराटने 58 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. त्याने 9 चौकार आणि 4 षटकार मारले होते. पण गेल्या 4 वर्षात विराटचा खेळ पूर्णपणे बदलला. आता ना धावा निघत आहेत ना त्याचे नशीब साथ देत आहे.

आयपीएल 2022 च्या हंगामात विराटने एकही अर्धशतक केले नाही. विराटने आयपीएलमध्ये 5 शतक केली आहेत. 2021च्या हंगामातील 15 लढतीत त्याने 119.45 च्या स्टाइक रेटने तर 2020 मध्ये 121.35 च्या स्टाइक रेटने धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून खेळताना विराटची हीच अवस्था आहे. 2019 नंतर त्याने एकदाही शतक केले नाही.

दरम्यान, आयपीएल 2022 मध्ये 31वी लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात नवी मुंबईत सामना झाला. या सामन्यात लखनौने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर अनुज रावत 4 धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीकडून मोठी खेळीची अपेक्षा होती. पण श्रीलंकेचा दुष्मंथ चमीराने पहिल्या चेंडूवर विराटला बाद केले. त्यामुळे, विराटवर आणखी किती काळ विश्वास दाखवायचा याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे.

खेळ

Join WhatsApp

Join Now