आजकाल लोकांना प्रवास (travel) करणे खूप आवडायला लागली आहे. काही लोक लांबच्या प्रवासाला कारने दौर्यावर जाता असतात. तर काही लोक बाईकवर खूप लांबचे प्रवास करून पर्यटनाचा (Tourism) आनंद घेतात. असाच एक अनोखी योजना योगेश आलेकरी ( Yogesh Alekari) यांनी केली आहे.
योगेशने मुंबईहून (Mumbai) लंडनला दुचाकीने जाण्याचे ठरवले आहे. तो २४ देश आणि ३ खंडांमध्ये २५००० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. त्यांचा प्रवास महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) म्हणजेच १ मे पासून सुरू होणार असून तो १०० दिवसांत हा प्रवास पूर्ण करणार आहे.
गेल्या ४ वर्षांपासून योगेशच्या मनात ही योजना होती. त्यांनी याआधी नेपाळ, भूतान, म्यानमार बॉर्डर, व्हिएतनाम, कंबोडिया या देशांमध्ये दुचाकीवरून प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांना माहित आहे की आंतरराष्ट्रीय बाईक राईडचे नियोजन करणे सोपे नाही.
प्रत्येक देशाला भेट देताना वेगवेगळी कागदपत्रे गोळा करावी लागतात. स्वतःची बाईक, बाईक पासपोर्ट, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी आवश्यक आहेत. योगेश सांगतो की, हे सर्व गोळा करण्याचे काम मी वर्षभरापूर्वी सुरू केले. या काळात मी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. या प्रवासासाठी ३० लाखांपर्यंत खर्च अपेक्षित असल्याचे योगेशने सांगितले.
बाईक चालवताना शारीरिक तंदुरुस्तीसोबतच तुम्हाला बाइकच्या फिटनेसचीही काळजी घ्यावी लागते. ऊन, वारा, पाऊस, वादळ अशा विविध नैसर्गिक बदलांना सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या प्रदेशातील खाद्यपदार्थ खावे लागतात.योगेश आशिया, युरोप, आफ्रिका या तीन खंडांना भेट देणार आहे.
१ मे रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून तो सुरुवात करणार आहे. बाइकवर मुंबई ते नेपाळ आणि तेथून यूएई विमानाने इराण, तुर्की, ग्रीस, इटली, ऑस्ट्रिया, जर्मनी, लक्झेंबर्ग, बेल्जियम, नेदरलँड, फ्रान्स, लंडन ते फ्रान्स, स्वित्झर्लंड ते फ्रान्स, मोरोक्को आणि स्पेन विमानाने भारतात परत येईल.अशा प्रकारे तो बाइक चालवण्याचा थरार अनुभवणार आहे.
योगेश नुकताच मुंबईला पोहोचला होता. त्यावेळी त्यांनी त्याचे आतापर्यंतचे अनुभव आणि त्यांच्या जगप्रवासाची माहिती दिली होती. योगेश गेल्या सहा-सात वर्षांपासून दुचाकी चालवतो. सुरुवातीला, त्याने महाराष्ट्रातील गडकिले येथे ट्रेकिंग आणि बाइक रायडिंगला सुरुवात केली, त्यानंतर त्याने भारतात १ लाख किलोमीटरहून अधिक बाइक रायडिंग केली आहे.
महत्वाच्या बातम्या
पोलिसांनी लॉजवर टाकलेल्या धाडीत सापडली कॉलेजची पोरगी अन् समोर आली धक्कादायक माहिती
नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार? जाहीर कार्यक्रमात म्हणाले, पुष्कळ झालं, आता…
उर्फी जावेद ही मुलगी नसून किन्नर आहे, अभिनेत्याचा दावा, पुरावेही देण्यास तयार





