Share

‘हा’ खेळाडू बनणार का RCB चा लकीचार्म? आजवर ज्या ज्या संघात खेळला ती टिम ठरलीय चॅम्पीयन

शनिवारपासून जगभरात लोकप्रिय असणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे यावर्षी तरी आयपीएलला नवा विजेता मिळणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. अशातच आयपीएल खेळाडू कर्ण शर्माचे नाव चर्चेत आले आहे. कर्ण शर्मा चार वेळा आयपीएल विजेत्या संघाचा भाग राहिला आहे.

यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणाऱ्या कर्ण शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या कर्ण शर्मावर लिलावात ५० लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, कर्ण शर्माची कामगिरी तितकी उत्तम नसली तरी फक्त आयपीएल विजेत्या संघाचा भाग राहिल्यामुळे त्याच्यावर ५० लाखांची बोली लावण्यात आली आहे.

यापूर्वी २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने आयपीएल जिंकली होती तेव्हा त्या संघात कर्ण शर्मा सहभागी होता. तसेच २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सने जेतेपद जिंकले असताना देखील मुंबईच्या संघाचा कर्ण एक भाग होता. इतकेच नव्हे तर, २०१८ ते २०२१ मध्ये कर्ण चेन्नई सुपर किंग्सच्या संघात होता. या काळात याच संघाने जेतेपद पटकावले होते.

परंतु आता कर्ण अशा संघाचा भाग झाला आहे ज्याने एकही जेतेपद पडकवलेले नाही. त्यामुळे यावर्षी आरसीबीच नशीब कर्णमुळे बदलेल का याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. आतापर्यंत कर्ण ज्या ज्या संघात खेळला आहे तो संघ आजवर जिंकत आला आहे. याकारणानेच यावर्षी आरसीबी जिंकणार असल्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या ८ वर्षांपासून कर्ण टीम इंडीयामध्ये जास्त सहभाग नोंदवताना दिसला नाही. आता कर्णचे वय वर्ष ३४ झाल्यामुळे तो टीममध्ये कमी प्रमाणातच दिसून येत आहे. परंतु आपल्या कारकिर्दीत कर्णने ६८ आयपीएल मॅचेस खेळल्या आहेत. तसेच त्याने २ वनडे मॅच आणि एक टी २० चा सामना खेळला आहे. या यशानंतर कर्ण आता आयपीएलच्या सामन्यांत आरसीबीसोबत खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंभोवती ईडीने फास आवळला, मेहुण्याची कोट्यवधींची संपत्ती जप्त; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
“राष्ट्रवादीच्या अशा फालतू नेत्याला भरचौकात फटके मारायला पाहिजेत”, शिवजयंतीवरून मनसे आक्रमक
‘मला कपडे काढून नाचण्यास सांगितले’, अभिनेत्रीचा काश्मीर फाइल्सच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप
झोमॅटोच्या १० मिनिटांत डिलिव्हरी सेवेवर रोहित पवार भडकले; म्हणाले, ‘मुलांच्या जीवाशी खेळ…’

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now