मागील काही महिन्यांत दाक्षिणात्य सिनेसृष्टीने बॉलिवूडमध्ये आपला धबधबा निर्माण केल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. एकामागून एक हिट चित्रपट देत या दाक्षिणात्य सिनेसृष्टीने हिंदी सिनेसृष्टीला मोठे आव्हान दिले आहे. आतापर्यंत आलेल्या ‘बाहुबली’, ‘केजीएफ’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ नंतर आता ‘केजीएफ २’ (KGF 2) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे.
‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ २’ या चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर ‘केजीएफ २’ हा चित्रपट अद्यापही सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. अशात हिंदी चित्रपटांना पुन्हा आपले पूर्वीचे स्थान निर्माण करणे एक मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे. अशात आता हिंदीत आगामी काळात येणाऱ्या या खालील चित्रपटांकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत.
आगामी काळात प्रदर्शित होणारे हे बिगबजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतील आणि दाक्षिणात्य चित्रपटांना टक्कर देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर कोणते आहेत हे चित्रपट, जाणून घेऊया.
१. लाल सिंग चढ्ढा –
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. आमिरने या चित्रपटासाठी बराच वेळ खर्च केला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच यशस्वी कमाई करेल, अशी अपेक्षा आहे. आमिरसोबत या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर दिसणार असून ११ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
२. ब्रम्हास्त्र –
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असलेला ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मोठी रक्कम खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रणबीर आणि आलियासोबत यामध्ये महानायक अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य अभिनेता नागार्जून आणि अभिनेत्री मौनी रॉयसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. अशात हा मल्टीस्टार आणि बिग बजेट असलेला चित्रपट ब्लॉकबस्टर हिट होणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी ९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
३. पठाण –
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानसाठी ‘पठाण’ हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे. कारण शाहरूख या चित्रपटाद्वारे तब्बल ५ वर्षांनी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ‘झीरो’ चित्रपटाच्या अपयशानंतर त्याने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता. त्यामुळे आता ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे त्याला खूप अपेक्षा आहेत. २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
४. टायगर ३ –
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २१ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. सलमानच्या यापूर्वी आलेल्या ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. अशात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
५. डंकी –
बॉलिवूडचा किंग खान शाहरूखने नुकतीच त्याच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. शाहरूखसोबत या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असणार आहे. तर २२ डिसेंबर २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर हा चित्रपटही मोठा हिट होईल आणि दाक्षिणात्य चित्रपटांना टक्कर देईल अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
सलमान खानने लग्न का केले नाही? प्रत्येक वेळी ब्रेकअप का होतात? वडील सलीम खान यांनी सांगितले खरे कारण
कारमध्ये असताना मुस्लिम परिवाराने जिंकले अनुपम खेर यांचे हृद, व्हिडीओ होतोय व्हायरल
तुरुंगातून बाहेर आलेल्या रवी राणांना पाहून नवनीत राणा हमसून हमसून रडू लागल्या, पहा व्हिडिओ