राजकीय वातावरण तापलेल असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहे. राज ठाकरे या दौऱ्यात वसंत मोरे यांच्या नाराजी नाट्याचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचे बोलले जातं आहे. तर दुसरीकडे येत्या 21 मेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत.
राज यांची ही सभा मुठा नदीपात्रात होणार आहे. अलीकडे राज ठाकरे यांनी पुण्यात वाढवलेले लक्ष आणि होऊ घातलेली सभा यातून काय साधलं जाणार याकडे राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागले आहे. याचबरोबर राज ठाकरे यांना विविध प्रकारची पुस्तक वाचण्याची आवड असल्याच सर्वानाच माहितीच आहे.
राज ठाकरेंनी या सध्याच्या राजकीय रणधुमाळीतही आपली वाचनाची आवड जोपासलेली पहायला मिळाली. दोन दिवस पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी मंगळवारी रात्री आठ वाजता पुण्याच्या बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरीतून काही पुस्तकांची खरेदी केली आहे.
राज ठाकरेंनी तब्बल ५०,००० रुपयांची पुस्तक खरेदी केली. सुमारे दीड तास राज ठाकरे पुस्तकांच्या सान्निध्यात रमले. अक्षरधारा बुक गॅलरीतून राज ठाकरेंची २००हून अधिक पुस्तकांची खरेदी केली. यामध्ये चरित्र, आत्मचरित्र, ऐतिहासिक, सामाजिक, कला विषयक २०० हून अधिक पुस्तकं आणि ग्रंथांची खरेदी केली.
यासोबतच बाबासाहेब पुरंदरेंच्या राजा शिवछत्रपती, इतिहासकार सरदेसाईंचे मराठी रियासत, इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांचा संपूर्ण ग्रंथसंच, मृत्युंजय पुस्तकाची नवी आवृत्ती खरेदी केली. राज ठाकरे यांच्या पुस्तक खरेदी विषयी अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी माहिती दिली.
याबाबत सांगताना राठिवडेकर म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती, इतिहासकार सरदेसाई यांचे मराठी रियासत, वा सी बेंद्रे यांचा संपूर्ण संच, मृत्युंजय पुस्तकाची नवी आवृत्ती, यातील काही पुस्तके राज यांच्याकडे होते, परंतु पुन्हा राज यांनी नव्याने ही पुस्तके खरेदी केली आहेत.
राज ठाकरेंच्या वाचनाच्या आवडीचा प्रचिती देणारा एक प्रसंग कोरोना काळात घडला होता. २०२० साली राज्य सरकारने मिशन बिगन अंतर्गत अनेक गोष्टी सुरु केल्या होत्या. मात्र करोना विषाणूमुळे ग्रंथालये बंदच होती. याच पार्श्वभूमीवर ग्रंथालय प्रतिनिधिंनी थेट राज ठाकरेंची भेट घेतली होती.
दरम्यान, त्यानंतर तात्काळ राज ठाकरेंनी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन केला. राज यांना फोन करून सामंत यांच्याकडे ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर अवघ्या ७ दिवसातच राज्य सरकारने ग्रंथलायं सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या
गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला भलेमोठे खिंडार; हार्दिक पटेल यांनी दिला राजीनामा
VIDEO: अली मर्चंटसोबत डान्स करताना पुनम पांडेचा सरकला टॉप; संतापलेले युजर्स म्हणाले, ‘बेशरम’
३२ वर्षे शेकापचा गड असलेल्या अख्ख्या गावानेच केला शिवसेनेत प्रवेश; जाणून घ्या यामागचं खरं कारण…
संभाजीराजे शिवसेनेत करणार प्रवेश? राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय घडामोडींना वेग