अनेकदा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कर्ज काढतो. आपल्याला एकरकमी रक्कम मिळते. यामुळे आपली स्वप्न पूर्ण होतात. यामध्ये घर खरेदी करण्यासाठी किंवा कार घेणे, व्यवसाय सुरू करणे किंवा इतर कारणांसाठी बँका कर्ज देतात, जे ठराविक वेळेनंतर व्याजासह फेडले जाते.
असे असताना जर कर्जाची परतफेड करण्यापूर्वी कर्जदाराचा मृत्यू झाला तर? यानंतर, बँक थकबाकीची रक्कम कोणाकडून वसूल करते? असा प्रश्न अनेकांना पडतो. ज्यावेळी कर्ज दिले जाते, त्यावेळी बँका काही ना काही स्वतःकडे तारण ठेवतात. जेव्हा कोणी कर्ज फेडत नाही तेव्हा बँक त्यांची मालमत्ता जप्त करते.
पण कर्जदार मेल्यावर कर्जाची परतफेड कोण करणार, हे कर्जाच्या प्रकारावर अवलंबून असते. त्यामुळेच वारस किंवा कुटुंबीयांकडून थकबाकी वसूल केली जात नाही. हे कर्ज वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज किंवा कार कर्ज यावर अवलंबून असते.
जर असे काही घडले तर या प्रकरणात बँका ती नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून घोषित करतात. वाहन कर्जाच्या बाबतीत प्रथम कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधला जातो. परंतु कोणतीही थकबाकी न भरल्यास वाहन किंवा ज्या वस्तूसाठी कर्ज घेतले होते ते जप्त करून थकबाकी वसूल केली जाते.
याबाबत असा नियम आहे. दरम्यान, जर दोन व्यक्तींनी मिळून कर्ज घेतले असेल तर एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसरी व्यक्ती थकबाकीची रक्कम भरणे बांधील असते. जर एखाद्याने गृहकर्ज घेतले असेल आणि त्याची परतफेड करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसांकडून थकित कर्ज वसूल केले जाते.
अनेकदा असा प्रश्न पडत असतो, किंवा अशी परिस्थिती निर्माण होत असते. तसेच काही वेळेस आपण बघतो की, बँक इन्शुरन्स देखील काढत असतात. यामुळे ते देखील पैसे मिळतात.