युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणारा रशिया सध्या चारीबाजुनी अडचणीत सापडताना दिसत आहे. अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. त्याचा फटका रशियाला बसताना दिसत आहे. रशियाकडून खनिज तेल आणि नैसेगिक वायू न घेण्याचा निर्णय अमेरिकेने जाहीर केला आहे.(Will other items be cheaper along with mineral oil)
युरोपातील अन्य देशही असाच निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे रशिया आता इंधनासाठी नवी बाजारपेठ शोधात आहे. याचा फायदा भारताला होताना दिसत आहे. रशियाने भारताला सवलतीच्या दरात खनिज तेल आणि अन्य वस्तू विकण्याची तयारी दर्शवली आहे.
तसा प्रस्तावच रशियाकडून भारताला देण्यात आला आहे. रशियाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर भारत विचार करत आहे. भारताने रशियाचा प्रस्ताव स्वीकारल्यास दोन्ही देशातला व्यवहार रुपया – रुबलमध्ये होईल. खनिज तेलासोबतच युरिया खरेदीवरही रशियाने भारताला सवलत दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रशिया खनिज तेल आणि अन्य उत्पादनावर मोठी सवलत देत आहे. त्यांच्याकडून खरेदी करताना आम्हाला निश्चितपणे आनंद होईल. टँकर, विम्याचे कवच आणि ऑइल ब्लेंड यांच्याशी संबंधित काही प्रश्न आहेत. ते सुटल्यावर आम्ही सवलतीचा प्रस्ताव स्वीकारू अशी माहिती दिली आहे.
रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे बहुतांश आंतरराष्ट्रीय व्यापारी रशियाकडून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणं टाळत आहेत. मात्र हे निर्बंध आम्हाला रशियाकडून इंधन खरेदी करण्यापासून रोखू शकत नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रुपया – रुबलची व्यवस्था तयार करण्या संदर्भात काम सुरू आहे. या व्यवस्थेचा वापर तेल आणि अन्य उत्पादनांना खरेदी करण्यासाठी केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र रशिया किती सवलतीत खनिज तेल देणार हे सांगण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
आता आपण फक्त दिवस मोजायचे..; प्रवीण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
कुशल बद्रिकेने बायकोसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, खरंच तुझा अभिमान वाटतो