भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे लवकरच शिवसेनेते प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी पांडेंवर टीका करत, संजय पांडेंची माफियागिरी सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच, असा देखील इशारा दिला आहे.
आता किरीट सोमय्यांच्या वक्तव्याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने कायदेशीर कारवाई केली. निष्पक्ष कारवाई केली तर तुम्ही त्यावर लगेच शिवसेनेचा शिक्का मारणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना, “तसं असेल तर गेल्या काही महिन्यांत किती पोलीस अधिकारी आणि आयएएस अधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला याची यादीच काढावी लागेल” असे त्यांनी म्हणले आहे. बुधवारी पांडे खरंच शिवसेनेत प्रवेश करतील का? असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना, “आधीच्या आयुक्तांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते खासदार झाले. ते चालतं का? ते त्यांच्या पालख्या उचलत आहेत. यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. कायदेशीर कारवाई केली तर त्यांच्यावर शिक्का मारता? राजेश्वरसिंग ईडीचा जॉइंट डायरेक्टर तो भाजपात सामिल झाला.” अशी माहिती राऊतांनी दिली आहे.
तसेच, “राजेश्वरसिंग आमदारकीची निवडणूक जिंकून आला. व्हिजिलन्स चौकशी सुरु आहे. इतर अनेक राज्यातील पोलीस आयुक्त, आयएएस अधिकारी भाजपात सामिल झाले. त्यासंदर्भात भाजपच काय म्हणणं आहे त्यांनी स्पष्ट करावं” असं आवाहन संजय राऊत यांनी भाजपला केलं आहे.
दरम्यान राणा दांपत्याला भेटण्यासाठी जाताना किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांवर आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले. यावेळी, “मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे माफियागिरी करत आहेत. माझ्या गाडीवर दगडफेक लाइव्ह दिसत होती. तेव्हा पांडे झोपले होते.” अशी टीका त्यांनी संजय पांडेंवर केली.
महत्वाच्या बातम्या
प्रसिद्ध अभिनेत्रीने बाळासोबत केले विचित्र कृत्य; संतापलेले नेटकरी म्हणाले, बाळ काय खेळणं वाटलं?
आम्रपाली दुबेच्या हनीमूनचा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का? शिल्पी- विजय चौहानचेही आहे खास कनेक्शन
सोमय्यांवरील हल्ल्यावेळी Z सेक्युरिटी कुठे होती? जाब विचारणाऱ्या CISFला आयुक्तांकडून जशास तसे उत्तर
मंदिराच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना, १० भाविकांचा जागीच मृत्यू; धक्कादायक कारण आले समोर