Share

मिस्टर आयपीएल चेन्नई सुपर किंग्समध्ये परतणार? टीममध्ये ‘या’ खेळाडूची जागा घेणार रैना, चर्चा सुरू

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) वेगवान गोलंदाज दीपक चहरवर (Deepak Chahar) मोठी बोली लावली होती. फ्रँचायझीने या वेगवान गोलंदाजाला 14 कोटींचे बक्षीस देऊन संघात सामील केले होते, परंतु दुखापतीमुळे तो स्पर्धेत एकही सामना खेळू शकला नाही आणि तो बाहेर पडला. चेन्नई आता दीपक चहरच्या बदलीच्या शोधात आहे आणि सुरेश रैनाच्या (Suresh Raina) रूपाने मिस्टर आयपीएल पूर्ण होऊ शकेल असे मानले जात आहे.(Will Mr. IPL return to Chennai Super Kings)

एका न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुरेश रैना संघात परत येऊ शकतो. त्याच आणि फ्रँचायझीच्या व्यवस्थापनात बोलणी सुरू आहेत. या गोष्टीची घोषणा कधीही होऊ शकते. सुरेश रैना फ्रँचायझीमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. मात्र, गेल्या सीजनमध्ये त्याची कामगिरी चांगली नसल्यामुळे संघाने त्याला यावेळी घेतले नव्हते.

जेव्हा सुरेश रैना आयपीएल-2022 च्या मेगा लिलावात न विकला गेला तेव्हा तो हिंदी कॉमेंट्रीमध्ये सामील झाला. तो सध्या आयपीएल सामन्यांची कॉमेंट्री करत आहे. सुरेश रैना संघात परत येऊ शकतो, ही बातमी खरी असेल तर सुरेश रैना आणि एमएस धोनीची जय-वीरू जोडी पुन्हा एकदा मैदानात चाहत्यांना पाहायला मिळेल.

चेन्नई सुपर किंग्जच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर सीएसके संघ आयपीएल समालोचन करणाऱ्या सुरेश रैनाला पुन्हा आपल्या टीममध्ये सामील करू शकतो. याचे एक कारण हे देखील आहे की, अंबाती रायडूची या सीजनमधील कामगिरी पूर्वीपेक्षा खूपच खराब झाली आहे. रायुडूने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात केवळ 20.50 च्या सरासरीने 82 धावा केल्या आहेत. चेन्नईने आतापर्यंत 5 सामन्यांपैकी फक्त 1 सामना जिंकला आहे.

रैनाने CSK साठी 200 सामने खेळले आहेत आणि 33.10 च्या प्रभावी सरासरीने 5529 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर 2 शतके आणि 38 अर्धशतके आहेत. दुसरीकडे एमएस धोनीच्या नावावर 219 सामन्यांमध्ये 4713 धावा आहेत. त्याने 23 अर्धशतके केली आहेत. धोनीने या सीजनपूर्वीच कर्णधारपद सोडले होते, तर रवींद्र जडेजा सध्या संघाचे नेतृत्व करत आहे.

आता दीपक चहरबद्दल बोलायचे झाले तर, दुखापतीमुळे तो सीएसकेसाठी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भाग घेऊ शकला नाही. लवकरच चाहर या सीजनमध्ये चेन्नईकडून खेळताना दिसेल, अशी आशा होती, पण नशिबाला बहुधा हे मान्य नव्हते आणि राष्ट्रीय क्रिकेट एकेडमीत सराव सुरू असताना त्याला पुन्हा दुखापत झाली. अशा परिस्थितीत तो आयपीएलच्या संपूर्ण सीजनमधून बाहेर आहे. दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्सने लिलावात तब्बल 14 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

महत्वाच्या बातम्या-
IPL 2022: चेन्नईचा सलग तिसरा पराभव झाल्यानंतर चाहत्यांना आठवला रैना, होतेय ही मागणी
म्हणून सुरेश रैना IPL लिलावात अनसोल्ड राहिला; कुमार संगकारानं सांगितली इनसाईड स्टोरी
IPL 2022: रवि शास्त्रींची सुरेश रैनासोबत धमाकेदार एन्ट्री, आयपीएलमध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी
सुरेश रैना या आयपीएल टीमसोबत सुरु करणार नवी इनिंग, CSK ला करणार कायमचे बाय-बाय?

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now