Share

किरीट सोमय्यांचे विरोधकांवरील आरोप कायमचे थाबंणार? खुद्द कोर्टानेच दिले ‘हे’ आदेश

kirit

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती असणाऱ्या सुजीत पाटकरांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप लावले होते. या आरोपांमध्ये त्यांनी पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोविड सेंटरमध्ये डॉक्टर पुरवण्याचे कंत्राट मिळवल्याचे म्हणले होते. परंतु या आरोपांमुळे आता सोमय्याच अडचणीत सापडण्याचे दिसत आहेत.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई दिवाणी न्यायालयाने सोमय्यांना तंबी देत खोटे आरोप न करण्याची ताकीद दिली आहे. न्यायालयाने सोमय्यांच्या खटल्याच्या आदेशात म्हटले आहे की, किरीट सोमय्या यांनी सर्वात प्रथम एक जबाबदार व्यक्ती म्हणून वस्तुस्थिती पाहिला हवी होती.

मुख्य म्हणजे, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि त्याच्या भागीदारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचे विधान करण्यापूर्वी त्यांनी वैयक्तिक पातळीवर सर्व बाबी तपासून घ्यायला हव्या होत्या. सोमय्यांनी फक्त मिळालेल्या ढोबळ माहितीच्या आधारे सर्व आरोप केले आहेत.

त्यामुळे इथून पुढे कोणतेही आरोप करण्यापूर्वी त्याबाबतचे सर्व पुरावे तपासावेत. विनाकारण खोटे आरोप यापुढे करू नयेत. मधल्या काळात, सोमय्यांनी राऊत कुटुंबावर 100 कोटीं रुपयांच्या जंबो कोविड केअर सेंटर घोटाळ्याचा आरोप केला होती.

याबाबतच त्यांनी चौकशीची मागणी देखील केली होती. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे हे कंत्राट पाटकर यांनी मिळवल्याचा आरोप सोमय्यांनी लावला होता. इतकेच नव्हे तर, पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोविड सेंटरमध्ये डॉक्टर पुरवण्याचे कंत्राट मिळवले असल्याचे सोमय्यांनी माध्यमांना सांगितले होते.

यानंतर संजय राऊत यांचे वाईन व्यवसायातील खास पार्टनर पाटकर असल्याचा खुलासा सोमय्यांनी केला होता. सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील वाद जास्तच चिघळला होता.

महत्वाच्या बातम्या
‘गाढव तुरुंगात जाताच लालपरी मुक्त झाली’, सामनाच्या अग्रलेखातून सदावर्ते यांच्यावर टीका
राज्यातील मंत्र्यांचा अजब कारभार! खाजगी रुग्णालयात घेतले उपचार, बिलांची वसुली मात्र सरकारी तिजोरीतून
दंगलखोर समाजाचे नाव सर्वांनाच माहिती आहे, हिंदू कधी दंगल करत नाही; ‘या’ क्रिडापटूचे वादग्रस्त वक्तव्य
आधी कार अपघातात मुलीला गमावलं, आता माजी क्रिकेटपटूची मृत्यूशी झुंज; मदतीचे आवाहन

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now