Share

पैशांसाठी काहीही करणार का? आलिया भट्टच्या ‘त्या’ जाहिरातीमुळे नेटकऱ्यांनी केलं तुफान ट्रोल

अनेक अभिनेते आणि अभिनेत्री चित्रपटांमध्ये काम करण्याबरोबरच अनेक प्रकारच्या जाहिराती देखील करत असतात. जाहिरातीमधून पैसे कमावण्याचा हा मार्ग अनेक सेलिब्रिटी स्वीकारतात, आणि जाहिरातींमधून लोकांना काहीना काही संदेश देत राहतात. मात्र, कधी कधी याच जाहिरातींमुळे अनेक सेलिब्रिटी ट्रोल देखील होतात.

असे अनेक उदाहरणे सांगता येतील, ज्यामध्ये सेलिब्रिटींनी केलेल्या जाहिरातीवरून त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. आता या सेलिब्रिटींच्या रांगेत अभिनेत्री आलिया भट्टचा देखील नंबर लागला आहे. आलियाने नुकतीच एक शुगरच्या प्रॉडक्टची जाहिरात केली. ती नेटकऱ्यांना न आवडल्यानं त्यांनी तिला ट्रोल केले आहे.

आलिया पैशांसाठी काहीही करायला तयार होईल. अशा शब्दांत तिच्यावर टीका होऊ लागल्या आहेत. नेटकऱ्यांच्या चिडण्याचे कारण म्हणजे, एकीकडे आलिया शाकाहाराचा प्रचार आणि प्रसार करते. तसेच चाहत्यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे धडेही ती नेटकऱ्यांना देत असते.

मात्र, दुसरीकडे साखरेच्या प्रॉडक्टची जाहिरात करते. तिनचं एका मुलाखतीतून यापूर्वी सोशल मीडियावरील आपल्या फॉलोअर्सला साखर आणि साखरेपासून तयार केलेले पदार्थ खाऊ नका, असे सांगितले होते. शिवाय ती एकदा कपिलच्या शो मध्ये आली असताना देखील साखर खात नाही असे म्हणाली होती.

यामुळे नेटकरी तिच्यावर चिडले आहेत. आलिया तर अजिबात साखर खात नाही मग साखरेची जाहीरात कशाला करते, असा प्रश्न तिला काही नेटकऱ्यांनी विचारत धारेवर धरले आहे. तर केवळ पैशांसाठी आलियाने अशा प्रकारची जाहिरात देणं चुकीचे असल्याचं देखील काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

याआधी, अभिनेता अक्षय कुमार देखील त्याच्या एका जाहिरातीमुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्यानं गुटख्याची जाहिरात केली होती. एकीकडे आरोग्यासंबंधित लोकांना धडे देणे आणि दुसरीकडे पैशासाठी गुटख्याची जाहिरात करणं त्याला चांगलंच महागात पडलं होतं. याबद्दल त्यानं जनतेची माफी देखील मागितली होती.

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now