Share

साऊथ इंडस्ट्रीला घाबरून बॉलिवूड आता पॅन इंडिया चित्रपट बनवणार? अजय देवगणने केला खुलासा

सध्या अजय देवगण (Ajay Devgan) त्याच्या ‘रनवे 34’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याही भूमिका आहेत. अजय देवगणने आता या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. याआधी अजय देवगण RRR या चित्रपटातही दिसला होता.(Will Bollywood now make Pan India movies out of fear of South Industry)

दुसरीकडे, KGF 2 मोठ्या पडद्यावर थिरकत आहे. अशा परिस्थितीत बॉलीवूडचे चित्रपट पैन इंडिया (संपूर्ण भारतात) का बनवले जात नाहीत आणि साऊथच्या चित्रपटांच्या यशाने बॉलीवूडला घाबरायला पाहिजे का? बॉलीवूड लाइफच्या अशाच काही प्रश्नांची अजय देवगणने उत्तरे दिली आहेत. जाणून घेऊ अजय देवगणचे याविषयी काय मत आहे.

अजय देवगण पॅन इंडियाच्या या ट्रेंडविषयी बोलताना म्हणाला की, पहा… देशभरातील वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केल्यानंतरच चित्रपटाला पॅन इंडिया म्हटले जाऊ शकते. त्यामुळे, हे होण्याआधी आपण संपूर्ण भारताबद्दल काहीही बोलू शकत नाही. तसंच, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून कलाकार घेऊन त्यांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आकर्षित करता यावेत यासाठी या चित्रपटांची रचना केली जात आहे. आम्ही (बॉलिवूड) अजून ते करत नाही आहोत. तसेच, शेवटी, ते येथे (हिंदी पट्ट्यात) काम करत आहेत कारण ते हिंदीत डब केले जात आहेत. ते इथे त्यांच्याच भाषेत काम करत नाहीत. त्यामुळे तसे पाहिले तर ते अजूनही हिंदी चित्रपट आहेत.

त्याचबरोबर दक्षिणेची तुलना बॉलीवूडशी करताना अभिनेते म्हणाले की, काही काळापूर्वी हॉलिवूडबाबतही असेच बोलले जात होते, परंतु तसे काही झाले नाही. त्यामुळे या गोष्टी नेहमीच चर्चेत राहतील, पण यापुढेही बॉलीवूड चांगलाच गाजेल यात शंका नाही. महत्त्वाचे म्हणजे, उत्तर, दक्षिण किंवा इतर कोणत्याही प्रदेशातील चित्रपट म्हणून पाहणे थांबवले पाहिजे आणि त्यांना भारतीय चित्रपट म्हणून पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.

‘रनवे 34’ चित्रपटाविषयी बोलताना अजय देवगण म्हणाला की, मला ही स्क्रिप्ट खूप मनोरंजक आणि मजबूत वाटली. अशा स्क्रिप्टवर काम करताना तुम्ही त्यात इतके गुंतून जाता की ते तुमच्या डोळ्यासमोर दिसायला लागते. सुरुवातीपासूनच मीच दिग्दर्शन करणार याची खात्री करून घेतली होती. दुसरे कारण म्हणजे मला आव्हानात्मक चित्रपट करायला आवडतात, या चित्रपटाची कथा खूप मजबूत होती.

‘शिवाय’मध्येही पर्वतांवर ज्या प्रकारची अॅक्शन आणि कॅमेरावर्क आहे तो असा होता की ज्याचा यापूर्वी कधीही प्रयत्न झाला नव्हता. इथेही ड्रामा कॉकपिटमध्ये करणं खूप गरजेच होत आणि हे काम फारसं सोपंही नव्हतं, तुम्हाला ते नियमितपणे करता येत नाही, त्यामुळे हा ड्रामा करण्यासाठी मला तांत्रिकदृष्ट्या खूप नवीन गोष्टी कराव्या लागल्या.

महत्वाच्या बातम्या-
अजय देवगण बनवणार बॉलिवूडमधील सगळ्यात महागडा चित्रपट, २०१८ सालीच केली होती घोषणा
अजय देवगण बनवणार ४०० कोटींची मेगा बजेट फिल्म, वाचा काय होणार त्याचे साईड इफेक्ट्स
वाढदिवस विशेष: अजय देवगणकडे आहे ८४ कोटींचे जेट, मुंबईमध्ये आहे आलिशान बंगला, संपत्ती वाचून हादराल
तब्बल एवढ्या कोटींचा मालक आहे अजय देवगण, संपत्तीच्या बाबतीत मोठमोठ्या स्टार्सना टाकतो मागे

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now