Share

भाजप की सपा येणार सत्तेत? शेतकऱ्यांनी लावली एक एकर जमिनीची पैज; गाव झाला साक्षीदार

पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यात विधानसभा निवडणूकांची मतमोजणी सुरु झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचे कल स्पष्ट होणार आहेत. या निकालांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पार्टीत नक्की कोण जिंकणार या मुद्द्यावरून एक एकर जमिनीची पैज लावण्यात आली आहे.

या पैजेचा साक्षीदार संपूर्ण गाव झाला आहे. हिंदुस्तान खबरने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पार्टीचे समर्थक विजय सिंह आणि शेर अली यांच्यामध्ये ही पैज लावण्यात आली आहे. यासंबंधीत कागदपत्रे देखील तयार करण्यात आले आहेत. या कागदपत्रांवर दोघांनी हाताचे ठसे सुध्दा दिले आहेत.

बदायूंवर शेखपूर विधानसभा मतदारसंघातील ककराला नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या बिरियाडांडी गावात राहणाऱ्या विजय सिंह यांचा दावा आहे की, यावेळेस पुन्हा भाजप सत्तेत येईल. तर शेर अली यांना वाटत आहे की, यावेळेस समाजवादीत पार्टीच सत्तेत येईल. या दोघांच्या वादाने टोकाचे पाऊल उचलले आहे.

गावकऱ्यांनी पंचायत बोलवून या दोघांमध्ये पैज लावली आहे. जर यावेळेस समाजवादी पार्टी सत्तेत आली तर विजय यांना शेर अलींना एक एकर जमिन द्यावी लागेल. परंतु जर भाजप सत्तेत आले तर शेर अली विजय यांना आपली एक एकर जमिन देतील.

त्यांच्या या वादामध्ये राजकिय नेत्यांनी सुध्दा हस्तक्षेप घेतला आहे. फक्त तोंडी पैज नको म्हणून पंचायतीने दोघांच्या जमिनीचे कागदपत्रे सुध्दा तयार केली आहेत. याचे फोटो सोशल मिडीयावर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अंतिम निकालावर लागून राहिले आहे.

सध्या समोर असलेल्या मतमोजणीच्या निकालानुसार, उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना सत्तास्थापनेसाठी म्हणजेच बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागणार आहे. मतमोजणीच्या निकालानुसार भाजपला हे संख्येवळ सहज मिळून जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now