मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेनंतर संपूर्ण राज्यच कामाला लागले आहे. राज्याच्या राजकारणात सध्या भोंग्यावरुन चांगलच राजकारण तापलं आहे.
तर दुसरीकडे या आंदोलनात राज ठाकरेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आणि पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे सहभागी नसल्याच्या चर्चाना उधाण आले होते. त्यानंतर सोशल मिडियावर वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चानी जोर धरला. याचबरोबर मोरे पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत.
यावर आता खुद्द मोरे यांनी भाष्य केलं आहे. अनेक दिवसांनी पहिल्यांदाच मोरे माध्यमांसमोर आले आहे. ‘मी नाराज नाही, पण मी सध्या शांत आहे, पक्ष ज्यावेळी मोठा होत असतो त्यावेळी पक्षांतर्गत कुरघोडी सुरु असतात. आज आमच्यामध्ये थोडे मतभेद आहेत मात्र, मनभेद नाहीत,’ असं मोरेंनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना मोरे म्हणाले, ‘ज्यावेळेस तुमचा संघर्ष सुरू असतो, तुमच्या मागे कोणीतरी बोलतं, तेव्हा तुम्ही असं समजयाचं की योग्य मार्गावर आहात, असं मी म्हणालो होतो. मात्र तुम्ही त्यातलं रस्ता बदलाल हे वाक्य घेतलं. पण मी राज मार्गावर आहे आणि राज मार्गावरच राहील,” असं स्पष्टच मोरे यांनी सांगितलं.
याचबरोबर ‘माझा रस्ता चुकतोय, असं काही नाही,’ असं देखील मोरे यांनी स्पष्ट केलं. याचबरोबर राज ठाकरेंनी पुकारलेल्या आंदोलनावेळी मोरे तिरुपती बालाजी गेले होते. यावरून देखील सोशल मिडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. याबाबत देखील मोरे यांनी बोलताना स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, ‘गेली १७ ते १८ वर्ष कायम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तिरुपती बालाजी येथे दर्शनाला जातो. तो माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. जर निवडणूक झाली तर मला यश मिळणार, हे निश्चित मनात ठेवले होते. त्यामुळे मी तिरुपतीचे बुकिंग करून ठेवले होते आणि निवडणूक झाली नाही, परंतु नियोजित असल्याने मी तिरुपतीला गेलो.”
महत्त्वाच्या बातम्या
खूपच ग्लॅमरस अवतारात दिसली सारा तेंडुलकर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पहा फोटो
‘या’ कारणांमुळे राज ठाकरेंच्या नातवाचं नाव आहे खास; जाणून घ्या नाव आणि त्याचा अर्थ
CSK vs RCB सामन्यादरम्यान बनली आणखी एक जोडी, भर स्टेडियममध्ये मुलीने केलं प्रोपोज
कार्तिक आर्यनच्या विरोधात आहे बॉलिवूड? करणसोबतच्या मतभेदांवर पहिल्यांदाच सोडले मौन






