प्रेम हे आंधळ असतं, असं अनेकदा बोललं जातं हे अगदी खरं..! प्रेम कधी कोणावर होईल याचा अंदाज लावणंच कठीण आहे. अनेकदा प्रेम प्रकरणातून विचित्र घटना देखील घडल्याचं समोर आलं आहे. प्रेमप्रकरणात अनेकदा प्रियकर – प्रियेसी हे टोकाचे पाऊल देखील उचलतात. अशा अनेक धक्कादायक घटना आपण पहिल्या आहेत.
अशातच असाच एक विचित्र प्रकार आता समोर आला आहे. पतीने आपल्या पत्नीला बॉय फ्रेंडबरोबर फिरताना रंगेहात पकडल आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला एक मुलगी देखील आहे. या प्रकरणाची सध्या परिसरात एकच चर्चा सुरू आहे. वाचा नेमकं घडलं काय..?
हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशच्या आग्रामधील असल्याच उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती, पत्नी आणि मुलगी असं हे कुटुंब..! मात्र काही दिवसांपासून पतीला आपल्या पत्नीचे बाहेर अफेअर सुरु असल्याची कुणकुण लागली होती. या कारणावरून त्यांच्यात अनेकदा वाद देखील व्हायचे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतच पतीने पत्नीला बॉय फ्रेंडबरोबर फिरताना रंगेहात पकडलं. त्याचं झालं असं की, ईलेक्ट्रीक स्कूटरवरून पत्नी आणि बॉयफ्रेंड दोघेही मस्त गप्पा मारत एन्जॉय करत जात होते. पतीने पत्नीचा ड्रेस ओळखला. अन् हायवेवरच गोंधळ झाला.
पतीने पाठलाग सुरू केला, सोबतच पतीने दोघांचा व्हिडिओ देखील काढला. पतीने हायवेवरच जोरजोरात गोंधळ घातला. त्यानंतर पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने गाडी थांबविली. दोघांमध्ये थेट मारामारी झाली. हे प्रकरण पाहून नागरिकांनी गर्दी केली. रस्त्यावरच गोंधळ झाला.
दरम्यान, या प्रकरणाची थेट पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेच्या पती आणि बॉयफ्रेंडला शांतता भंग केल्याच्या गुन्ह्याखाली पावती फाडली. या सोबतच दोघांनाही पुन्हा असा प्रकार न करण्याचा इशारा दिला.
महत्त्वाच्या बातम्या
Raj Thackeray : मनसे – शिंदे गट महापालिका निवडणूका एकत्र लढवणार?, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Garba : आता गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश नाही; लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मोठा निर्णय
दाभोळकर हत्या तपासाबाबत कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिसांची पोलखोल करत केला ‘हा’ दावा
“यापुढे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजेत”, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंची उडाली झोप
Garba : आता गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश नाही; लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मोठा निर्णय
दाभोळकर हत्या तपासाबाबत कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिसांची पोलखोल करत केला ‘हा’ दावा
“यापुढे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजेत”, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंची उडाली झोप