Share

‘त्यांना जास्त त्रास देऊ नका’, संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजेंनी काळजीपोटी जोडले हात

sanyogitaraje

खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषणाला बसले आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाने संभाजी छत्रपती यांना पाठिंबा दिला आहे. संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात जमले आहेत.

आज तिसऱ्या दिवशी संभाजीराजेंची तब्येत बिघडली आहे. त्यांची शुगर कमी होत असल्याचं समजतंय. संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. त्यांना आम्ही इंजेक्शन घेण्यास सांगितलं आहे. मात्र ते इंजेक्शन घेण्यास देखील तयार नाही,असंही डॉक्टर म्हणालेत.

शेकडो मराठा तरुणांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला आहे. तसेच या आंदोलनात सुरुवातीपासून संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे त्यांच्या सोबत आहेत. आज देखील संयोजिताराजे त्यांच्या सोबत होत्या. यावेळी त्यांनी समन्वयकांना विनंती केली आहे.

यावेळी बोलताना संयोजिताराजे शिष्टमंडळाला विनंती करत म्हणाल्या की, तोडगा काढूनच या. तसंच राजेंना कोणीही मानसिक त्रास देऊ नका, अशी हात जोडून त्यांनी विनंती केली. हायपोप्लासियात गेल्यावर त्यांना मानसिक त्रास देणं चांगलं नसल्याच देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, संभाजीराजेंच्या तब्बेतीबाबत सांगताना डॉक्टर म्हणाले की, गेल्या 60 तासांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. त्यांची शुगर आणि ब्लड प्रेशर कमी झालं आहे. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी ते देखील घेण्यास नकार दिला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

तसेच चिंतेची कालपासून संभाजीराजे यांना तीव्र डोकेदुखीचा त्रासही जाणवत आहे. डॉक्टरांनी कालच सलाइन लावण्याचा सल्ला दिला. मात्र संभाजीराजेंनी सलाइन लावून घेण्यास नकार दिला. कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यास संभाजीराजे यांनी नकार दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपाला मतदान करणं महिलेला पडलं महागात, गुंडानी केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण
बिबट्याशी दहशत! औरंगाबादमध्ये धावत्या दुचाकीवर बिबट्याने घातली झडप आणि.., वाचून थरकाप उडेल
देशासाठी कायपण! रशियन सैन्याला रोखण्यासाठी बदादुर युक्रेनियन सैनिकाने स्वत:ला पुलासोबत उडवले
आलिया भट्ट आहे तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मालकीण, संपत्तीच्या बाबतीत मोठमोठ्या अभिनेत्रींनाही टाकते माग

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now