VIDEO: हार्दिक पांड्याला मिठी मारताच पत्नी नताशाला अश्रु अनावर, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव करून आयपीएल २०२२ चे विजेतेपद पटकावले. T२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर टीकाकारांच्या निशाण्यावर आलेल्या हार्दिक पांड्यासाठी ही ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियातून वगळल्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सनेही कायम ठेवले नाही. आता दमदार कामगिरी करत त्याने संघाला चॅम्पियन बनवल्यावर त्याची पत्नी नताशा त्याला मैदानात मिठी मारत भावूक झाली.(Hardik Pandya, Gujarat Titans, Rajasthan Royals, Trophy)

https://twitter.com/Ashok94540994/status/1530978490887319552?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530978490887319552%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-watch-viral-video-natasa-stankovic-gets-emotional-after-meeting-husband-hardik-pandya-post-gt-win-ipl-title-4286714.html

संघाच्या विजयानंतर मैदानात पोहोचलेल्या नताशाला हार्दिक पांड्याने मिठी मारली. नताशा खूपच भावूक दिसत होती. बराच वेळ हार्दिक काही बोलत तिला सांभाळताना दिसत होता. काही वेळाने ती हसत हार्दिकच्या गालावर हात ठेवून प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यानंतर चॅम्पियन बनणारा हार्दिक हा चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे.

सामन्याबद्दल बोलायचे तर कर्णधार हार्दिक पंड्या (३/१७) आणि रवी श्रीनिवासन साई किशोर (२/२०) यांच्या घातक गोलंदाजीमुळे, गुजरात टायटन्सने (GT) आयपीएलच्या विजेतेपदाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी राजस्थान रॉयल्सची (आरआर) २० षटकांत ९ बाद १३० अशी अवस्था झाली. गुजरात पुढे त्यांनी १३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

प्रत्युत्तरात गुजरात टायटन्स संघाने अवघ्या ३ विकेट्स गमावून सामना जिंकला. त्यासाठी शुभमन गिलने ४३ चेंडूत नाबाद ४५ धावांची सर्वाधिक खेळी खेळली. हार्दिकने ३४ तर डेव्हिड मिलर ३२ धावांवर नाबाद परतला. आयपीएलमध्ये नशिबाने हार्दिकवर नक्कीच कृपा केली आहे. जेव्हा जेव्हा तो प्लेऑफ खेळला तेव्हा त्याने चॅम्पियन खेळाडू म्हणून सीजन पूर्ण केला. मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि आता गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून चार वेळा विजेतेपद पटकावण्यात  यशस्वी ठरला.

हा विजय काही खास आहे का, असे विचारले असता? यावर हार्दिक म्हणाला, ‘होय, कारण मी कर्णधार म्हणून हे विजेतेपद पटकावले आहे. याआधी मी एक खेळाडू म्हणून जिंकलेली ४ जेतेपदेही माझ्यासाठी खास आहेत. आयपीएल जिंकणे नेहमीच खास असते. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, आयपीएलचे ५ फायनल खेळलो आणि पाच वेळाही माझ्या हातात चमकदार ट्रॉफी आली. साहजिकच हा विजय वारशाचा भाग असेल कारण आम्ही नवीन फ्रँचायझी होतो आणि पहिल्यांदाच आयपीएल खेळत होतो आणि पदार्पणाच्या सीजनमध्ये आम्ही चॅम्पियन झालो.’

महत्वाच्या बातम्या-
गुजरात फायनलमध्ये पोहोचताच हार्दिक पांड्याच्या डोक्यात गेली हवा, म्हणाला, माझं नाव विकलं जातं त्यामुळं..
VIDEO: हार्दिक पांड्याची ती एक चूक गुजरातला घेऊन बुडाली असती, पण नशिबाने दिली साथ
सामन्यापुर्वी मयंकला चिडवत होता हार्दिक पांड्या, पराभवानंतर उतरला माज, नेटकऱ्यांनी केले ट्रोल
हार्दिक पांड्यामुळे गेली या चाहत्याची नोकरी? आपल्या कृतीवर आता होत असेल पश्चाताप