wife love with brother in law | प्रेमातून अनेक धक्कादायक घटना घडल्याच्या समोर येत असतात. अनेकदा काही लोक प्रेमासाठी जीवही घेतात. आता असाच एक प्रकार मध्ये प्रदेशातील रिवा जिल्ह्यातून समोर आला आहे. या ठिकाणी एका दिराने आपल्या वहिणीसोबत मिळून भावाचाच जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना मौगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निबिहा गावातील आहे. जिथे ४ दिवसांपूर्वी पोलिसांना मानवी सांगाडा सापडला होता. सांगाड्याची ओळख पटू शकली नव्हती. मात्र पोलिसांनी आणखी तपास केल्यानंतर हा सांगाडा निबिहा सुशील पाल (४० वर्षे) यांचा असल्याचे समोर आले. ते गेल्या दीड वर्षांपासून बेपत्ता झालेले होते.
पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची माहिती घेतली असता त्याच्या पत्नीचे दिर गुलाब पाल याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. त्यावर संशयाच्या आधारे पोलिसांनी दिर गुलाब पाल याला ताब्यात घेऊन चौकशी केली. गुलाब पालने आपणच भावाचा जीव घेतला असल्याचे कबूल केले आहे.
आरोपीने सांगितले की, सुशीलला आपल्या आणि वहिणीच्या नात्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पत्नीने समोसा चटणीमध्ये विष मिसळून सुशीलला तो समोसा खायला दिला होता. तो समोसा खाल्ल्यानंतर सुशील बेशुद्ध झाला. त्यानंतर गुलाबने त्याचा जीव घेतला.
सुशीलचा घरच्या काही सदस्यांसोबतही वाद होता. त्यामुळे गुलाबने जेव्हा सुशीलचा जीव घेतला. त्यानंतर यामध्ये घरातील काही सदस्यांनी सुद्धा गुलाबची साथ दिली. त्यांनी सुशीलचा मृतदेह लपवण्यात गुलाबला मदत केली होती, असेही आरोपीने पोलिसांसमोर कबूल केले आहे.
भावाचा जीव घेतल्यानंतर गुलाबने पेंढ्याच्या ढिगाऱ्यात मृतदेह लपवून ठेवला होता. १७ महिने तो पेंढ्यांच्या ढिगाऱ्यातच होता. पण त्यानंतर त्याचा वास यायला लागल्यामुळे त्यांनी तो सांगाडा नाल्यात फेकून दिला होता. त्यानंतर पोलिसांना तो सांगाडा सापडला आणि या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला.
महत्वाच्या बातम्या-
Devendra Fadanvis : माझ्यामुळे बच्चू कडू गुवाहाटीला गेले हे म्हणून फडणवीस पक्के फसले; आता शिवसेनेने केले ‘हे’ गंभीर आरोप
bacchu kadu : ‘पहिली वेळ माफ आहे, पण…,’ बच्चू कडूंनी शेलक्या शब्दात रवी राणांना घेरले
T20 World Cup : … म्हणून न्युझीलंड दौऱ्यावर विराट-रोहितला विश्रांती देण्यात आली; निवडकर्त्यांचा केला मोठा खुलासा






