महाराष्ट्रातील भिवंडी येथून एका खुनाची घटना उघडकीस आली आहे. जिथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला ठार मारले. या घटनेनंतर मारेकरी पतीने पोलीस ठाणे (Police Thane) गाठून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर आरोपीने पोलिसांना सांगितले की, पत्नीचा गळा दाबून हत्या करून आपण इथे आलो आहे. तिचा मृतदेह घरातच पडून आहे.(Obscenity, Wife, Murder, Police Thane)
पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोहम्मद मुस्ताक (Mohammad Mustaq) हा त्याची पत्नी आणि पाच मुलांसह भिवंडीच्या काल्हेर भागात राहत होता.
१५ वर्षांपूर्वी अबिदा खातून (Abida Khatun) नावाच्या महिलेशी त्यांचा विवाह झाला होता. पत्नीचे कोणाशी तरी अवैध संबंध असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्याने पत्नीला प्रियकराशी अश्लीश कृत्य करताना पकडले होते. रागातभरात खोलीत पडलेल्या वायरने पत्नीचा गळा आवळून खून केला.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने थेट नारपोली पोलिस ठाणे गाठून पोलिसांसमोर संपूर्ण हकीकत सांगितल्यानंतर आत्मसमर्पण केले. आरोपीला तीन मुले आणि दोन मुली अशी एकूण पाच मुले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींना अटक करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.