पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून एका व्यक्तीने पत्नीला मारण्यासाठी मारेकऱ्यांना सुपारी दिल्याची घटना समोर आली आहे. पत्नीने त्याच्या परवानगीशिवाय मोबाईल खरेदी केल्यामुळे त्याने ही सुपारी दिली. या प्रकरणाचा खुलासाही अतिशय रंजक पद्धतीने झाला. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. (Wife buys mobile without telling angry husband)
ही घटना कोलकात्यातील नरेंद्रपूर भागातील आहे. येथील पोलिसांनी गुरुवारी रात्री आरोपी पती आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या मारेकऱ्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने काही महिन्यांपूर्वी तिच्या पतीकडून मोबाईल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र पतीने फोन घेण्यास नकार दिला. ही महिला मुलांना ट्युशन शिकवून काही पैसे कमवत असे.
दरम्यान, 1 जानेवारी रोजी महिलेने पतीच्या परवानगीशिवाय मोबाईल खरेदी केला. हा प्रकार पतीला समजताच तो चांगलाच संतापला आणि त्याने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने पत्नीला मारण्यासाठी सुपारी दिली आणि मारेकऱ्याला पत्नीला मारण्यास सांगितले. यानंतर मारेकऱ्याने पत्नीवर हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री महिलेवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली मात्र तिचा जीव वाचवण्यात यश आले. पोलिसही तेथे पोहोचले आणि महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. दुसरीकडे, पोलिसांनी हल्लेखोर आणि तिच्या पतीला पकडले. दुसरा हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे, सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
राजेश झा (Rajesh Jha) असे पतीचे नाव असून, सुरजीत असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. विशेष म्हणजे पती-पत्नीचा अनेक वर्षाचा संसार असून त्यांना 11 आणि 5 वर्षांच्या 2 मुली आहेत. आरोपी पती मोबाईल स्टोअरमध्ये अकाउंटंट म्हणून काम करतो. तसेच महिला बीकॉम ग्रॅज्युएट असून मुलांना शिकवते.
महत्वाच्या बातम्या
‘ताई उठ ना गं…डोळे उघड, बघ तुझा दादा आहे मी’; महिन्यावर लग्न आलेल्या बहिणीचा भावासमोरच तडफडून गेला जीव
“मी आधी त्यांना पाठिंबा दिला होता पण…; किरण माने यांनी राजकारणात यावं”
‘पुष्पा’च्या यशानंतर शरद केळकरने व्यक्त केली भिती; म्हणाला, आपण आपलं मुळ विसरतोय त्यामुळं..
बोनी कपूर यांनी शबाना आझमीसोबत केला डान्स; व्हिडिओ पाहून जान्हवी म्हणाली, पापा….