Share

कोरोनात डॉक्टर का करत होते DOLO चा उदोउदो? इन्कम टॅक्सच्या छाप्यात उलगडले रहस्य; १ हजार कोटींचा घोटाळा आला समोर

कोरोना काळात प्रत्येकाला माहित झालेली एक गोळी म्हणजे डोलो ६५०. कोरोना काळात या गोळीची मोठ्या प्रमाणात लोकांकडून खरेदी झाली. त्यामुळे या गोळीची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब लिमिटेड कंपनीला यातून प्रचंड नफा मिळाला. परंतु या कंपनीने डॉक्टरांना तब्बल १००० कोटीची फ्री गिफ्टस् वाटप केल्याचे धक्कादायक प्रकरण आता समोर आले आहे. (Why was the doctor in Corona doing DOLO’s Ududo? Secrets revealed in Income Tax raids)

अधिक माहितीनुसार, ६ जुलैला ९ राज्यांमधल्या मायक्रो लॅब कंपनीच्या ३६ ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यातून १२० कोटी रुपयांची बेनामी, अज्ञात रक्कम तसेच १४० कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे, असे सीटीबीटीने सांगितले.

आयकर विभागांनी टाकलेल्या विविध छाप्यांमधून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे आणि डिजिटल डेटाच्या तपासणीतून मायक्रो लॅब कंपनीने १००० कोटीच्या भेटवस्तू वाटप केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. त्यानंतर विभागाकडून कंपनीला पाठवण्यात आलेल्या ई-मेलला कोणतेच उत्तर आले नाही.

बाजारामध्ये या गोळीची किंमत कमी आहे. कोरोना काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकांकडून या गोळीची खरेदी करण्यात आली. ३५० कोटी गोळ्यांची सरासरी विक्री बाजारामध्ये झाली. त्यामुळे कंपनीने तब्बल ४०० कोटी रुपयांचा नफा कमवला.

‘डोलो ६५०’ ही गोळी सामान्यतः तापावर वापरली जाते. वेदनाशामक (वेदना कमी करणारी), अँटिबायोटिक (ताप कमी करणारी) म्हणून कोरोना काळामध्ये ही गोळी डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात रुग्णांना सुचवली जायची. त्यामुळेच बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात या गोळीला मागणी वाढली होती.

आयकर विभागाने कंपनीच्या कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल १००० कोटी रुपयांची गिफ्टस् विविध डॉक्टर तसेच संबंधितांना वितरित केली. हे गुपित समोर आल्याने या गोष्टीची चर्चा सर्वत्र होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
तिच्या डोळ्यात रोज पाणी असतं, तुम्ही तुमच्याच लोकांवर.., सायना नेहवालचा नवरा भडकला
शिवसेनेचा उमेदवार पडल्यानंतर बाळासाहेब फक्त एक ग्लास.., संजय शिरसाठ यांनी सांगितला किस्सा
रावसाहेब दानवेंचा मुलगा झाला शरद पवारांचा फॅन, म्हणाला, त्यांच्या राजनैतिक कौशल्यातून मला…

 

आरोग्य ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now