एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. येथील अनेक आमदार शिंदे गटात गेले. त्यात राजेश क्षीरसागर यांचा देखील समावेश आहे. त्यांनी हिंदुत्वाचा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटात प्रवेश केला, मात्र आता त्यांनी बंडखोरी करण्याचं खरं कारण सांगितलं आहे.
शिवसेनेमध्ये बंड करत एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदार फोडले याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातही झाला असून कोल्हापूर शिवसेनेमध्ये ही आता मोठी खिंडार पडली. कोल्हापूरचे विद्यमान दोन खासदार आणि आमदार यांच्यासोबत माजी आमदार राजेश क्षीरसागर हे शिंदे गटाला जावून मिळाले.
आपण हिंदुत्वाच्या मुद्यांमुळे भाजप सोबत गेलो असल्याचे बंडखोरांकडून सांगितले जात होते. मात्र आता हळू हळू सर्वांची खरी खदखद समोर येत असून माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी अखेर त्यांच्या मनातील खरी खदखद काल बाहेर काढली. त्यांनी शिंदे गटात जाण्याचं खरं कारण सांगितलं.
म्हणाले, कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता मात्र दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लागली आणि तेथे मी जिंकून आलो असतो मात्र एवढे असतानाही मातोश्रीचा आदेश म्हणून मी पोट निवडणूक लढवली नाही.
मात्र, मी एवढा मोठा त्याग केला तरीही राज्यसभेच्या निवडणुकी वेळी माझा विचार न करता पक्षाने संजय पवार यांना उमेदवारी दिली. जिल्ह्याच्या राजकारणात संजय पवार यांनी पक्षाला कधीच साथ दिली नाही. तरीही त्यांना उमेदवारी देण्यात आली, असे क्षीरसागर म्हणाले.
तसेच म्हणाले, ज्यांची जनतेतून निवडून यायची लायकी नाही त्यांनीच पक्ष संपवल्याची टीका केली. तर आम्ही शिवसेना प्रमुखांना सोडले नाही आणि सोडणार नाही. पण, पक्ष कसा चालवावा हे शरद पवार यांच्याकडून शिकावे, अशी टीका देखील क्षीरसागर यांनी यावेळी केली.