आलिया भट्ट (Alia Bhatt) बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी देऊन चाहत्यांना खूश केले होते. याशिवाय, आलियाचे अनेक चित्रपटदेखील रिलीज होणार आहेत. ‘डार्लिंग्स’ हा त्यापैकी एक आहे. जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. आलिया या चित्रपटासाठी जोरदार प्रमोशन करत आहे.
अलीकडेच, अभिनेत्रीने एक मुलाखत दिली. ज्यामध्ये अभिनेत्री आक्षेपार्ह टिप्पणीवर उघडपणे बोलली आणि सांगितले की ती अश्या कमेंटकडे लक्ष देत नाही. इंडस्ट्रीतही अशा विधानांना सामोरे जावे लागते, असा खुलासाही आलियाने केला. आलिया भट्टने तिच्या मुलाखतीत खुलासा केला की महिलांना समाजात चुकीच्या गोष्टींना कसे सामोरे जावे लागते.
इंडस्ट्रीतही अनेक प्रसंगी लैंगिकता असते. या कमेंट्स ऐकल्यानंतर तिला लैंगिकता जाणवली नाही, असे अभिनेत्रीने सांगितले. स्वत:बद्दल बोलताना आलिया भट्ट म्हणाली की, मला अनेकदा आक्षेपार्ह कॉमेंट्रीचा सामना करावा लागला आहे. तरीही मी लक्ष देत नाही. पण मी या सगळ्याचा खूप विचार करते, कारण मला या समस्येची जाणीव आहे.
जेव्हा मी याबद्दल विचार करते, तेव्हा मला असे वाटते की, ही एक लैंगिक टीका होती. कधीकधी माझे मित्रही मला सांगतात की मी खूप आक्रमक झाली आहे. मी खूप संवेदनशील आहे. आलिया पुढे म्हणाली की, मित्र मला अनेकवेळा सांगतात की इतके संवेदनशील होऊ नको. तुला मासिक पाळी आली आहे का? मग मी म्हणते, की मी संवेदनशील नाही.
तुमचा जन्मही यामुळे झाला आहे कारण स्त्रियांना मासिक पाळी येते. आलिया शेवटी म्हणाली की, मला खूप राग येतो जेव्हा लोक म्हणतात की तुझी ब्रा लपवून ठेव. ब्रा का लपवायची? ते एक वस्त्रच आहे ना. पुरुषांना त्यांची अंतर्वस्त्र लपवायला का नाही सांगितली जात? माझ्यासोबत असे झाले नाही पण महिलांना त्यांच्या गोष्टी लपवाव्या लागतात. सिनेमामध्ये अनेकदा या गोष्टींना सामोरे जावे लागते.
महत्वाच्या बातम्या
मविआ’त बिघाडी! यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार; बड्या शिवसेना नेत्याची घोषणा
अब्दूल सत्तार म्हणाले कुत्रा हे चिन्ह जरी दिले तरी मी निवडून येईल; एकनाथ शिंदेंनी सांगीतला किस्सा
Sanjay Raut: पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार झाला कसा? ED च्या बिनतोड युक्तीवादाने राऊतांच्या वकीलाची बोलती बंद
स्मृती इराणीच्या मुलीला मिळाली क्लीनचीट; ‘त्या’ रेस्तराँच्या प्रकरणात हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय