Share

अक्षय कुमारसोबत काम का करत नाही? शाहरूख म्हणाला, मी जेव्हा झोपायला जातो तेव्हा तो..

बॉलीवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खान आणि ‘बॉलीवूड के खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमारची जोडी ११९७  साली ‘दिल तो पागल है’ चित्रपटात पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर दोघांची जोडी एकत्र दिसली नाही. मात्र, त्यांच्या  चाहत्यांना त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहायचे आहे.(Akshay Kumar, Shahrukh Khan, Chitrapat, Dil To Paagal Hai,)

पण कदाचित चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते कारण ‘दिल तो पागल है’ नंतर किंग खानने अक्षयसोबत काम करणार नसल्याचे ठरवले होते. यामागची कारणे काय आहेत, हे त्यांनीच सांगितले होते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. वास्तविक, ही घटना तेव्हा घडली जेव्हा अक्षय कुमारचे एकापेक्षा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत होते आणि त्याचवेळी चाहते ‘झिरो’ चित्रपटानंतर शाहरुख खानच्या कमबॅकची वाट पाहत होते.

एका मुलाखतीत किंग खानला विचारण्यात आले होते की, ‘दिल तो पागल है’ रिलीज होऊन २४ वर्षांनंतर तुम्ही कधीही एकदा पडद्यावर एकत्र दिसला नाही? त्यानंतर किंग खानने एका मुलाखतीदरम्यान यामागचे कारण सांगितले. शाहरुखने उत्तर देत म्हटले की, मी अक्षयसोबत काम करू शकत नाही, यात मी काय करू शकतो.

अक्षय कुमार जितक्या लवकर उठेल तितक्या लवकर मी उठू शकत नाही. मी झोपायला जातो तोपर्यंत त्याची उठायची वेळ झालेली असते. त्याचा दिवस लवकर सुरू होतो. मी कामाला लागेपर्यंत त्याची बॅग भरलेली असेल आणि तो घरी जायला तयार असेल. शाहरुख पुढे म्हणाला की, मी या बाबतीत थोडा वेगळा आहे. रात्री उशिरापर्यंत शूटिंग करायला आवडणारे माझ्यासारखे फारसे लोक तुम्हाला सापडणार नाहीत.

एकीकडे अक्षय कुमार ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘सेल्फी’ करत आहे. ‘गोरखा’ आणि ‘हेरा-फेरी 3’ धमाल उडवणार आहे आणि शाहरुख खान ‘पठाण’, ‘डंकी’ आणि ‘जवान’ या आगामी चित्रपटांसह ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

महत्वाच्या बातम्या
शिवसेना अजूनही उद्धव ठाकरे यांचीच आहे; घटनातज्ज्ञ उल्हास बापट असे का म्हणाले?
अग्निपथ योजनेवर भडकला लष्करी जवान, म्हणाला, सरकारी मालमत्ता जाळून टाका, त्याशिवाय…
अचानक ओरडण्याचा आवाज आला अन्.., कन्हैयालालला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने सांगितला थरारक घटनाक्रम

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now