Narendra Modi, old photo, Chief Minister, Prime Minister/ नरेंद्र मोदी (Narendra Modi) गेल्या आठ वर्षांपासून देशाची धुरा सांभाळत आहेत, मात्र आज सकाळपासून सोशल मीडियावर एक छायाचित्र मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. Modi Archive नावाच्या अकाऊंटवरूनही हे छायाचित्र ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे. या अकाऊंटवरून आणखी फोटो शेअर केले जात आहेत. यामध्ये पंतप्रधान जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्या गोष्टी नमूद केल्या आहेत.
पीएम मोदींचा हा फोटो 21 वर्षे जुना आहे. आजच्या दिवशी 21 वर्षांपूर्वी, 7 ऑक्टोबर 2001 रोजी, मोदींनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर ते सतत गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि 12 वर्षे 227 दिवस या पदावर राहिले. त्यानंतर ते पंतप्रधान झाले. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये गुजरातचे तत्कालीन राज्यपाल सुंदर सिंह भंडारी हे नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रीपदाची शपथ देत आहेत.

व्यासपीठावर गुजरातचे प्रसिद्ध पोलीस अधिकारी डीजी वंजाराही उपस्थित होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तातडीने कामाला सुरुवात केली आणि त्यांनी 10 जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ फोनवरून संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी वेबसाईटच्या माध्यमातून लाइव्ह करण्यात आला होता.
जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते तेव्हा ते गुजरात विधानसभेचे सदस्यही नव्हते. जानेवारी 2002 मध्ये, मुख्यमंत्री बनल्यानंतर चार महिन्यांनी, त्यांनी गुजरात विधानसभेवर जाण्यासाठी राजकोट-2 मधून निवडणूक लढवली. त्यानंतर 2002 ची निवडणूक जिंकून ते आमदार आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले.
यापूर्वी 4 ऑक्टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदी यांची गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते कुशाभाऊ ठाकरे आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांची उपस्थिती होती. नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा करताना तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेलही उपस्थित होते.
7 ऑक्टोबर 2001 ते 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत नरेंद्र मोदी हे संवैधानिक पदावर कायम राहिले. ते 12 वर्षे 227 दिवस मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. आणखी एक गंमत म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री राहण्यासाठी विधानसभेचे सदस्य असणे आवश्यक होते. तेव्हा राजकोट पश्चिमचे आमदार वजुभाई वाला यांनी त्यांच्यासाठी जागा रिकामी केली होती. जानेवारी 2002 मध्ये राजकोट पश्चिममध्ये निवडणुका झाल्या. मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढवलेल्या नरेंद्र मोदींनी 14 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला, त्यांना 57.32 टक्के मते मिळाली.
महत्वाच्या बातम्या-
pm narendra modi : “नरेंद्र मोदींचं वागणं दारूड्यासारखं झालंय”, प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
narendra modi : गुजरात दौरा फ्लॉप? मोदींचं भाषण सुरू होताच प्रेक्षका गेले निघून, सभेचा व्हिडिओ तुफान व्हायरल
pm narendra modi : पंतप्रधान भाषण करत असताना प्रेक्षकांनी काढता पाय घेतला; वाचा नेमकं काय घडलं?






