Share

health : सुहागरात्रीला ग्लासभर दूध पिण्याची प्रथा का आहे? यामागचे वैज्ञानिक कारण वाचून आश्चर्य वाटेल

first night

health : आपल्या देशात लग्नामध्ये विविध प्रकारचे विधी पार पडतात. त्यातील नवदांपत्याच्या पहिल्या रात्री ग्लासभर दूध पिण्याला पण एका प्रकारचा विधीच मानले जाते. मात्र अशा प्रकारे सुहागरात्रीला दूध पिणे, यामागे अनेक कारणे आहेत. फार पूर्वीच्या काळापासून भारतीय विवाह पद्धतीत अशा प्रकारे दूध पिण्याचा रिवाज आहे. आपण आज त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

नवीन जोडप्याचा विवाह झाल्यावर पहिल्या रात्री नववधू आपल्या नवऱ्यासाठी ग्लासभर दूध घेऊन जाते. यामागे अनेक कारणे आहेत. तर लग्नाच्या पहिल्या रात्री त्या दोन व्यक्तींमध्ये शारीरिक संबंध घडवून येतात. त्यावेळी याची मदत होते. कारण हे दूध प्यायल्यामुळे सेक्स पॉवर वाढते.

हे साधारण दूध नसून त्यामध्ये काजू, बदाम ,बडीशेप, काळी मिरी, केशर असे पदार्थ टाकलेले असतात. त्यामुळे हे दूध प्यायल्यामुळे माणसाचा मुड रिलॅक्स होतो. भीती कमी होते व शारीरिक संबंध बनवताना उत्साह निर्माण होतो. रोमान्स अधिक वाढतो.

दुधामध्ये असलेली काळी मिरी आणि बडीशेप अँटीबॅक्टरियल म्हणून काम करते. आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. त्याचबरोबर पुरुषाचा स्पर्म काउंट आणि मेटीलिटी वाढण्यास या दुधामुळे मदत होते. रोमान्स करण्यास तो अधिक उत्तेजित होतो.

असं म्हटलं जातं की, दोन व्यक्तींमध्ये पहिल्यांदा शरीरसंबंध घडून येताना इन्फेक्शनची भीती असते. मात्र हे दूध प्यायल्यामुळे रोगप्रतिकारकक्षमता वाढते व त्याचा धोका कमी होतो. त्यामुळेच सुहागरात्रीला ग्लासभर दूध पिण्याचा हा रिवाज पडला असेल. ज्यामुळे पहिल्यांदाच शारीरिक संबंध बनवण्यासाठी जवळ येणाऱ्या दोन व्यक्तींमधील भीती दूर होऊन उत्साह वाढवण्यास मदत होते.

दुधामधील बदाम, केसर हे पदार्थ हार्मोन ऍक्टिव्ह करण्याचे काम करतात. हे दूध आपली पचनशक्ती वाढवते. या दुधामुळे शरीरात अँटीबॅक्टरियल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम होते. त्यामुळे सुहागरात्रीला अशाप्रकारे ग्लासभर दूध पिण्याची प्रथा तयार झाली असावी. अशा प्रकारची वैज्ञानिक कारणे यामागे असल्याचे सांगितले जाते.

महत्वाच्या बातम्या-
Shivsena : शिवसेना का सोडली? छगन भुजबळांनी केला मोठा खुलासा, म्हणाले, त्यावेळी बाळासाहेबांनी…
BJP: शिंदे गटामुळे भाजपला पडणार खिंडार? सांगलीचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजप विरोधातच करणार आंदोलन
Devendra Fadanvis : राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही नक्कीच….

 

ताज्या बातम्या आरोग्य इतर

Join WhatsApp

Join Now