महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील डॅशिंग नेते वसंत मोरे नेहमी त्यांनी केलेल्या राजकीय विधानाने चर्चेत असतात. मात्र, आता त्यांनी केलेल्या एका संवेदनशील फेसबुक पोस्टकडे सर्वांचे लक्ष गेलं आहे. त्यांनी केलेली पोस्ट ही चर्चेचा विषय ठरली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे यांनी आता एक फेसबुक पोस्ट केली आहे जी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी सुरुवात करत लिहिले की, समाज ईतका संवेदनाहीन का झालाय तेच समजत नाही…
त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत झालेला प्रसंग सांगितला, म्हणाले, वेळ काल रात्रीची ११:५०मिनिटांची वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला आणि घरी जात असताना कात्रज भरचौकात एका फूटपाथ वर एक तरुणी तिच्या राहणीमानावावरून तर ती सुखवास्तु वाटत होती खुप मोठ्याने रडत बसली होती.
आजूबाजूने लोक तिच्याकडे पहात जात होती बाजूला ४ ते ५ रिक्षावाले उभे होते पण कोणच तिला तिच्या रडण्याचे कारण विचारत नव्हते, मी स्वतः गाडी चालवत होतो अचानक गाडीच्या प्रकाशात मला ती मुलगी दिसली मी गाडी थांबवली लाईट बंद न करता तिला रडण्याचे कारण विचारले तर ती आजून मोठ्याने रडू लागली…
इतक्यात एक तरुण तिकडे आला त्याने तिची ओळख असल्याचे सांगितले. मी मुलीला त्या तरुणाबाबत विचारले असता ती देखील ओळखते म्हणाली. पण मी तिला त्याच्या ताब्यात दिली नाही. नंतर, तिच्या वडिलांना ४ फोन लावले त्यांनी एकही फोन उचलला नाही…
मी शेवटी तिच्या आईला फोन लावला एव्हाना १२ वाजून गेले होते आईला विचारले …. ही तुमची मुलगी आहे का ? हो बोलल्या कुठे आहे तर कामावर गेली आहे…मी बोललो आहो ती कामावर नाही इकडे रडत आहे त्यावर त्यांचे उत्तर मन सुन्न करणारे होते त्या बोलल्या हो का ?
आपली तरुण मुलगी रात्री १२:०० वा.अज्ञात ठिकाणी रडत बसती आणि आई बाप बिंदास घरी झोपू कसे शकतात ? त्यानंतर, मी ती मुलगी त्या अज्ञात तरुणाच्या ताब्यात देताना त्याची पूर्ण चौकशी केली आईला त्या तरुणाबाबत विचारले त्याच्या गाडीचा फोटो काढला त्याचा नंबर घेतला आणि त्याला सज्जड दम ही दिला…
https://www.facebook.com/100044231363898/posts/pfbid0468nNnv5Tq1m1dZfFzJR8kJs9zSWEmipVn3HG8N7rLX5vDHqXDCRy3nsHqMKCkwSl/
तिला घरी पोचवले की फोन किंवा मेसेज कर आणि अपेक्षेप्रमाणे त्याचा मेसेज आला आणि मगच झोपलो… एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून मी तर माझे कर्तव्य केले होते…एव्हाना नेहमीप्रमाणे जमलेली गर्दी जमल्याप्रमाणे लगेच पांगली ही पण मी मात्र विचार करत घरी गेलो की ज्या अघटित घटना घडतात त्याला समाजातील हीच मरत चाललेली असंवेदना तर कारणीभूत नाही ना ? नुसते जागे होऊन चालणार नाही… असे वसंत मोरे यांनी लिहिले.