why elon musk remove parag agrawal in twitter company | टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे ट्विटरचे नवे मालक बनले आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि सीएफओ नेड सेगल यांना एलोन मस्क मालक बनल्यानंतर कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. एवढेच नाही तर त्यांना कंपनीच्या मुख्यालयातूनही हाकलून देण्यात आले आहे.
एलोन मस्कने या वर्षी १३ एप्रिल रोजी ट्विटर खरेदीची घोषणा केली होती. त्याने प्रति शेअर ५४.२ डॉलर या दराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ४४ बिलियन डॉलर्समध्ये विकत घेण्याची ऑफर दिली होती. पण नंतर स्पॅम आणि बनावट खात्यांमुळे त्याने तो करार थांबवला.
त्यामुळे ट्विटरने न्यायालयात धाव घेतली होती. पण नंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला मस्कने आपली भूमिका बदलली आणि पुन्हा करार पूर्ण करण्यास सहमती दर्शवली. दरम्यान, डेलावेर न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत हा करार पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानंतर आता एलोन मस्कने ट्विटर विकत घेतले आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवालने आधीपासूनच एलोन मस्करच्या विरोधात होता. त्यानंतर एलोन मस्कचाही परागशी वाद झाला होता. एलोन मस्कने ट्विट खरेदीची घोषणा केल्यानंतर पराग अग्रवाल खुप नाराज झाले होते.
कराराची घोषणा झाल्यानंतर पराग अग्रवाल हॉलमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांशी भेटले. त्यावेळी तो तिथे जाऊन ते म्हणाले की, कंपनीचे भविष्य मला आता अंधारात दिसत आहे. मला माहिती नाही की ते आता केणत्या दिशेने जाईल. पराग यांच्या या वक्तव्यांमुळे त्यांची हकालपट्टी होणार याबाबत सोशल मीडियावर आधीच चर्चा केली जात होती.
ट्विटर खरेदीच्या घोषणेनंर पराग अग्रवाल आणि एलोन मस्क यांच्यात चर्चा झाली होती. त्यावेळी दोघांनी सोबत मिळून काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पण मस्कचा विचार होता की सर्वांनी मॅनेजमेंटने काम करायला हवे. पण पराग यांना ही गोष्ट आवडत नव्हती. ते म्हणाले की, मॅनेजमेंटचे काम मला आवडत नाही. कोणी कोणाचा बॉस असावा मला असे वाटत नाही. मी तांत्रिक किंवा डिझाईनिंगच्या समस्या सोडवायला मदत करु शकतो.
पराग यांची ही भूमिका मस्कला आवडली नाही, त्यामुळे त्या दोघांमधले संबंध खुप खराब झाले. त्यामुळे एलोन मस्कने पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केल्याची चर्चा आहे. डिसेंबर २०२१ मध्ये पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ बनले होते. गेल्या १० वर्षांपासून ते ट्विटरमध्ये काम करत होते.
महत्वाच्या बातम्या-
shivsena : “शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट”; ठाकरेंवर टीका करत बड्या नेत्याने ठोकला पक्षाला रामराम
‘एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर सामंत म्हणतात की, यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू
Pakistan : बॅगा भरा अन् कराचीला निघा; झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ झाला तुफान ट्रोल