Share

Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!

heart attack

Health : हृदयविकाराची समस्या सामान्य झाली आहे. मात्र तरीही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याचा जीव वाचेलच अशी खात्री कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे ही मोठी गंभीर बाब आहे. हार्ट अटॅक सकाळीच शक्यतो का येतो? याबद्दल आपण आज अधिक माहिती जाणून घेऊयात. तसेच कोणत्या व्यक्तींना याचा अधिक धोका संभवतो? हे देखील बघुयात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पहाटे चारच्या सुमारास आपले शरीर सायटोकिनिन हे हार्मोन बाहेर सोडत असते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका असतो. काही संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून हे पुढे आले की, आपल्या शरीराचे एक जैविक घड्याळ असते. जे आपल्याला रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करते.

आपण काम केव्हा करतो? विश्रांती केव्हा घेतो? या सगळ्याचा मागोवा ते जैविक घड्याळ घेत असते. तसेच काही व्यक्ती दिवसभर खूप सक्रिय असतात. त्यांना रात्री पूर्ण शांत विश्रांती घेण्याची गरज असते. तसेच त्यामुळे सकाळच्या वेळेस सुरुवातीच्या काही तासात आपल्या हृदयाची गती व रक्तदाबाची गती तीव्र असते. त्यामुळेच हृदयविकाराचा धोका संभवतो.

हृदयविकाराचा धोका बदलती जीवनशैली, वाढता ताण-तणाव तसेच खाण्याच्या अयोग्य पद्धती यामुळे सुद्धा वाढतो. आपल्या आहारात उत्तम पोषक पदार्थांचा समावेश करणे, ८ तास पुरेशी झोप घेणे व नियमित व्यायाम करणे या सवयी लावून घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

हृदयविकाराबाबत अधिक सांगायचे झाल्यास, सर्केदियन रिदम आपल्या शरीरात २४ तास घड्याळाप्रमाणे चालू असतो. जो वातावरण बदल, तुमच्या झोपण्याच्या, जगण्याच्या वेळा याचा मागोवा घेत असतो. तज्ञांच्या मते,सर्केदियन रिदमला हार्ट अटॅक येण्यास जबाबदार मानले पाहिजे.

सर्केदियन सिस्टीम सकाळी मोठ्या प्रमाणात PAI 1 पेशी सोडत असते. या पेशींमुळे रक्तात गुठळ्या तयार होतात. आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान करण्याची सवय यामुळे सुद्धा हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे आपण याबाबत सतर्क असणे व योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक ठरते.

ताज्या बातम्या आरोग्य

Join WhatsApp

Join Now