Share

Vedanta project : वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेला? कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवालांनी केला खुलासा

वेदांता आणि फॉक्सकॉनचा १.५४कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध विरोधक असा वाद प्रतिवाद होताना दिसत आहे. विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरले आहे, तर सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

या प्रकरणावरून शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध विरोधक यांच्यात वाद प्रतिवाद सुरू असताना आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी हा प्रकल्प गुजरातला का गेला याचे स्पष्टीकरण दिलं आहे.

हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. वेदांता आणि फॉक्सकॉनच्या सेमी कंडक्ट प्रकल्प गुजरातला हलवण्यावरुन महाराष्ट्रात राजकारण सुरु झाले आहे. त्यात अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कोणताही हस्तक्षेप नसून आमच्या टीमने सर्वेक्षण करुन हा निर्णय घेतला आहे.

हा प्रकल्प गुजरातला का गेला याबाबत स्पष्टीकरण देताना अग्रवाल यांनी म्हटलं की, प्रकल्पासाठी गुजरातमधून सर्व सहकार्य मिळाले. प्रकल्पासाठी गुजरातमधून अनेक सवलती मिळाल्या यामुळेच या प्रकल्पासाठी गुजरातची निवड करण्यात आली.

म्हणाले, कोणताही प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जागेबरोबर वीज आणि पाणी या दोन गोष्टीची आवश्यकता असते. गुजरातमध्ये या सुविधांसह अनेक सवलती मिळाल्या, त्यामुळे प्रकल्प गुजरातला नेण्यात आला असे अनिल अग्रवाल यांनी सांगीतले.

दरम्यान, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर येणाऱ्या काळात एक लाख रुपये किंमतीचा लॅपटॉप केवळ ४० हजाराहून कमी किंमतीत मिळणार आहे. सेमीकंडक्टर चिप आणि ग्लासचे भारतातील उत्पादनाबाबत झालेल्या एका मुलाखतीत अनिल अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

राज्य आर्थिक इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now