प्रिया बापट(Priya Bapat): मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे प्रिया बापट. ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटकांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. प्रिया तिच्या उत्तम अभिनयसोबतच सौंदर्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. २००० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरुवात केली.
प्रिया बापट सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या येणाऱ्या प्रोजेक्टबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. नुकताच प्रियानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला तिने थोडे वेगळे पण भन्नाट कॅप्शन दिले आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
नक्की काय घडलंय प्रियासोबत
प्रियानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्याकडे मोठी बॅग दिसत आहे. मात्र मोठी बॅग दिसत असली तरीही तिची मोठी गफलत झाल्याचं पहायला मिळत आहे. प्रियासोबत नक्की घडलंय काय हे तिनं फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन सांगितलंय. ‘जेव्हा तुम्ही मोठी बॅग आणता मात्र पैशांचं पॉकेटच आणायला विसरता, तेव्हा काहीशी अशी अवस्था होते – अब पैसा कौन देगा रे’. फोटोमध्ये प्रियाचे हावभाव परिस्थितीला साथ देणारे आहेत. प्रियाने केलेल्या या पोस्टवर चाहते अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
उत्तम अभिनय तर प्रिया करतेच त्याचबरोबर ती तिच्या वेगळ्या फॅशनशैलीमुळे देखील कायम चर्चेत असते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करून नेहमी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते. आतापर्यंत प्रियानं अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. आता काही हिंदी वेबसिरिजमध्येही तिला पाहायला मिळाल आहे. त्यामुळे प्रियाच्या चाहत्या वर्गात आणखी भर पडत आहे. तिनं तिच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.
त्याचबरोबर प्रियाला स्वतःच्या फिटनेसबाबत फार जागरूकता आहे. प्रिया नेहमी तिच्या कामाविषयी तर चर्चेत असतेच पण तेवढीच ती तिच्या फिटनेसविषयीही चर्चेत आहे. ती तिच्या फिटनेसकडेही तेवढंच लक्ष देते. ती सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते ज्यामध्ये ती तिची फिटनेस दाखवत असते.
महत्वाच्या बातम्या
Arjun Kapoor: अजुनतरी मलायकासोबत लग्नाचा विचार केला नाही कारण.., अर्जुन कपूरने केला मोठा खुलासा
१६ एकरवर पंगती, लाखो भाविक, ६४ ट्रॅक्टरमधून प्रसादाचे वाटप, ८ दिवस सुरू होती चूल
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यातून काढण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी थोपटले दंड, घेतला मोठा निर्णय
‘रेड’मधील अजय देवगण स्टाईलने आयकर विभागाची छापेमारी, जालन्यातून ३९० कोटींची मालमत्ता जप्त






