Share

नेहमी शांत संयमी असणारे नितीन गडकरी का संतापले? म्हणाले त्यांना मी सोडणार नाही…

केंद्रीय रस्ते वाहतून मंत्री नितीन गडकरी यांचा गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात गडकरी म्हणतात, ‘माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल मला फरक पडत नाही’. मात्र आता या व्हिडिओवर गडकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.

नितीन गडकरी यांनी या संदर्भात कारवाईचा इशारा दिला आहे. काही माध्यम संस्था आणि व्यक्तींकडून सुरू असलेल्या खोट्या प्रचाराचं सत्य, असं म्हणत नितीन गडकरींनी व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी व्हायरल होणारा व्हिडीओ आणि खरा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओवर नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गडकरी यांचे दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातील विधानाची मोडतोड केल्याने ते संतापले आहेत. त्यांनी असे करणाऱ्यांना ताकीद दिली आहे. गेल्या दोन दिवसापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या व्हिडिओवरुन गडकरी संतापले आहेत.

गडकरी यांनी हा व्हिडिओ ट्विट करत त्यासोबत अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे. गडकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,आज पुन्हा काही माध्यमे, सोशल मीडिया आणि व्यक्तींनी माझ्या वक्तव्यांचा वापर करत माझ्याविरुद्ध वाईट आणि बनावट प्रचार करून राजकीय फायदा करून घ्यायचा प्रयत्न केला आहे.

सरकार, पक्ष आणि मेहनत घेणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही. मी या व्हिडिओत काय म्हणालो आहे, याची लिंक मी शेअर करत आहे, असे गडकरी यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी दोन्ही व्हिडीओ शेअर केले आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत गडकरी म्हणतात, ‘तुम्हाला शक्य असेल तर माझ्या सोबत उभे रहा. नाही राहिला तरी हरकत नाही. मंत्रीपद गेले तरी चालेल. मी राजकीय पटलावर नाही. मी एक सामान्य व्यक्ती आहे. फुटपाथवर खाणारा थर्ड क्लासमध्ये पिक्चर पाहणारा आणि पडद्यामागून नाटक पाहणाऱ्यांमधून मी मोठा झालो आहे. मला ते जीवन खुप भारी वाटते. जेव्हा झेड प्लस सक्युरिटी सोडून मी फुटपाथवर निघून जातो’ गडकरी यांनी म्हटले आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now