Share

Nitin Gadkari: वाजपेयी अन् अडवाणींमुळेच भाजपची सत्ता आली असं गडकरी का म्हणाले? वाचा यामागचे कारण

Nitin Gadkari

Nitin Gadkari, Atal Bihari Vajpayee, LK Advani, Deendayal Upadhyay/ भाजप सत्तेत येण्याचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), लालकृष्ण अडवाणी (LK Advani) आणि दीनदयाळ उपाध्याय (Deendayal Upadhyay) यांच्या कार्याला दिले आहे. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या एका कार्यक्रमात ते याविषयी बोलले. यावेळी त्यांना 1980 च्या भाजपच्या अधिवेशनातील वाजपेयींचे भाषण आठवले.

उल्लेखनीय आहे की, यापूर्वी नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळातून हटवण्यात आले होते, तर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांचा या मंडळात समावेश करण्यात आला होता. गडकरी म्हणाले, अटलजी म्हणाले होते, ‘अंधार छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा.’ गडकरी म्हणाले, मी तिथे होतो. ते भाषण ऐकणाऱ्या प्रत्येकाला असा दिवस येईल असा विश्वास होता.

ते पुढे म्हणाले, अटलजी, अडवाणीजी, दीनदयाल उपाध्याय आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी असे कार्य केले की आज आपण नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात आणि अनेक राज्यांमध्ये सत्तेत आहोत. या आठवड्यात गडकरींना भाजपच्या संसदीय मंडळातून हटवण्यात आले आहे. सत्ताकेंद्रित राजकारणावर बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचारवंत दिवंगत दत्तोपंत ठेंगडी यांचाही उल्लेख केला.

केंद्रीय मंत्री म्हणाले, ठेंगडीजी म्हणायचे की प्रत्येक नेता त्याच्या पुढच्या निवडणुकीचा विचार करतो. तो पुढील पाच वर्षांचा विचार करतो, कारण त्याला वाटतं या निवडणुकीनंतर पुढची निवडणूक कधी येईल. पण प्रत्येक सामाजिक-आर्थिक सुधारक ज्याला समाज आणि देश घडवायचा आहे, तो एका शतकापासून दुसऱ्या शतकाचा विचार करतो. तो शंभर वर्षांचा विचार करतो. या कामासाठी कोणताही ‘शॉर्ट कट’ नाही.

इतकंच नाही तर NATCON 2022 कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी केंद्रातील मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. नितीन गडकरी म्हणाले की, आपल्याकडे पर्यायी गोष्टी असायला हव्यात. याद्वारे आपण गुणवत्तेशी तडजोड न करता खर्च कमी करू शकतो. बांधकामाच्या कामात वेळ खूप महत्त्वाचा आहे. हे सर्वात मोठे भांडवल आहे. सरकार वेळेवर निर्णय घेत नाही ही सर्वात मोठी समस्या आहे.

चार रस्ते प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी सरकार पुढील महिन्यात भांडवली बाजाराशी संपर्क साधणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले. ते म्हणाले की इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvIT) द्वारे पैसे उभे केले जातील आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 लाख रुपयांची गुंतवणूक मर्यादा असेल. आम्ही चार रस्ते प्रकल्पांसाठी भांडवली बाजाराशी संपर्क साधू, असे गडकरी यांनी FICCI तर्फे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले. त्यात सात ते आठ टक्के खात्रीशीर परतावा मिळेल.

महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : अधिकाऱ्याच्या कानशीलात वाजवणाऱ्या संतोष बांगरांना मुख्यमंत्री शिंदेंनी दिला ‘हा’ सल्ला
Chief Minister: …त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मुलीने थेट डॉक्टरांनाच केली मारहाण, नंतर मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी
Nitin Gadkari : फडणवीस दिल्लीत गेले तर ‘या’ नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी, गडकरींचे मोठे वक्तव्य
Nitin Gadkari : नितीन गडकरींना हटवण्यामागे भाजपचा काय प्लॅन आहे? महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? 

 

राजकारण ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now