why chhagan bhujbal leave shivsena | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा नुकताच ७५ वा वाढदिवस झाला आहे. त्यानिमित्त एका कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाषण केले होते. त्यांनी यावेळी बोलताना म्हटले होते की, तुम्ही शिवसेना सोडायला नको होती.
उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांना या मुलाखतीत शिवसेना सोडल्याची खंत किंवा बाळासाहेबांना अटक केल्याबद्दल खंत वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
त्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन झाली, तेव्हा शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत आम्ही श्रीकृष्ण आयोगाची स्थापना करु असे आश्वासन दिले होते. त्या सरकारमध्ये मी गृहमंत्री होतो. आधीच्या सरकारने सर्व फाईल्स बंद केल्या पण एकेदिवशी माझ्या टेबलावर एक फाईल आली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, त्या फाईलमध्ये पोलिसांचे काही अहवाल होते. त्यावेळी मी बाळासांहेबांविरोधात गुन्हा नोंदवला नसता, तर श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी केली नाही, असा आरोप आमच्यावर झाला असता. ज्यावेळी बाळासाहेबांना अटक झाली, तेव्हा त्यांना जेलमध्ये टाकू नका, असे निर्देश मी पोलिसांनी दिले होते.
तसेच यावेळी त्यांनी शिवसेने सोडण्याबाबतही वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, शिवसेना सोडण्याची काही वेगळी कारणं होती. वसंतदादा मुख्यमंत्री असताना मी विधानसभेमध्ये आमदार होतो. मंडळ आयोग जाहीर झालाच पाहिजे अशा घोषणा त्यावेळी आम्ही देत होतो.
तसेच व्हीपी सिंग यांनी मंडळ आयोगाची घोषणा केल्यानंतर बाळासाहेबांनी त्याला विरोध केला. जातीनिहाय आरक्षण देऊ नये अशी बाळासाहेबांची भूमिका होती. पण त्यावेळी मी भटक्या विमुक्त जातींच्या मोर्च्यात सहभागी झालेलो होतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
BJP: शिंदे गटामुळे भाजपला पडणार खिंडार? सांगलीचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजप विरोधातच करणार आंदोलन
Devendra Fadanvis : राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही नक्कीच….
politics : बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा रुपाली पाटलांनी घेतला समाचार, म्हणाल्या, पुढच्या सात जन्मातही…