Share

Thane : ‘पहाटे ६ पर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ठाण्यातील खड्डे का दिसत नाहीत?’ शिंदेंना घरातूनच आव्हान

नुकतेच ठाण्यातील कोपरी येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यादरम्यान विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाणे शहारत पडलेल्या खड्ड्यांमुळे ठाणेकर नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. मुंबईतून ठाण्यात प्रवेश करताच वाहन चालकांना ठाण्यातील खड्ड्यांना आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

ठाणे शहारत अनेक भागात खड्डे पडले असून कोपरी पुलावर ही खड्याचे साम्राज्य पसरलं असल्याचं खासदार विचारे यांच्या पाहणी दौऱ्यात निदर्शनास आले. शनिवारी त्यांनी कोपरी पुलाची पाहणी केल्यानंतर तेथील रस्त्यांची दुरवस्था पाहून चिंता व्यक्त केली.

यावर आता ठाकरे गटाचे शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री नेहमीच आपल्या ठाण्यातील निवासस्थानी येत असतात. परंतु ६ वाजेपर्यंत काम करणाऱ्या या मुख्यमंत्र्यांना खड्डे का दिसत नाहीत असा त्यांनी केला आहे.

दरम्यान, हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर सकाळी व संध्याकाळी कोपरी रेल्वे पुलाच्या अरुंद मार्गिका असल्याने वाहतूक कोंडीमुळे होणारा खोळांबा टाळण्यासाठी या पूलाचे रुंदीकरणाचे काम एमएमआरडीए व रेल्वे मार्फत सुरू आहे.

पहिल्या टप्प्यातील चार मार्गिका तयार होऊन ९ ऑक्टोंबर २०२१ रोजी तो नागरिकांसाठी खुला केला. परंतु दुसऱ्या टप्प्यातील ४ मार्गिका सुरू करण्यासाठी जुना रेल्वे पुल तोडण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्यामुळे रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूस भराव भरण्याचे काम तत्काळ सुरु करा असे विचारे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना बजावले आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now