काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची आतुरता लागली होती तो निकाल अखेर काल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत भरघोस यश मिळाले आहे.
याचबरोबर दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळावेत अशी सर्वच विद्यार्थी आणि पालकांची इच्छा असते. यासाठी विद्यार्थी प्रत्येक विषयाचा कसून अभ्यास करतात. मात्र पुण्यातून एक वेगळीच बातमी समोर येत आहे. एका विद्यार्थ्याला दहावी बोर्डात सर्वच विषयात ३५ गुण मिळाले आहेत.
सध्या या पठ्ठ्याची राज्यात चर्चा सुरू आहे. शुभम जाधव असे या मुलाचे नाव आहे. हा पुण्यात राहतो. विशेष बाब म्हणजे, या पठ्ठ्याने सगळ्याच विषयात 35 गुण मिळवलेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिकणाऱ्या शुभमचे वडील राहुल जाधव हे टाक्या नीट करण्याचे काम करतात तर आई संगीता जाधव या धुनी भांडी करतात.
शुभमच्या या अनोख्या प्रतापावर त्याच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. वडिलांनीही लेकाचा अभिमान वाटत असल्याचं म्हटंलय. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. शुभमला ३५ टक्के गुण पडल्याचे वाईट वाटलं. पण, त्याने दुकानात काम करुन त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचा अभिमानही वाटतो, अशी प्रतिक्रिया वडिलांनी दिली आहे.
वडिलांचे ही प्रतिक्रिया पाहून शुभमलाही अश्रु अनावर झाले. ‘अरे लेका रडतोय काय, आपल्याला अजून पुढं जिंकायचंय, रडू नकोस…,’ असे म्हणत वडिलांनी शुभमला धीर दिला. दरम्यान, शुभमला पुढे जाऊन पोलिस बनायचं आहे, देशाची सेवा करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.
दरम्यान, दहावीत सहाही विषयात ३५ गुण मिळल्याने त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत. तसेच शुभमच पुणेरी पगडी घालून सत्कार देखील करण्यात आला. यापूर्वी देखील अनेक विद्यार्थ्यांना 35 टक्के पडल्याच आपण पाहिले आहे. तर दुसरीकडे सध्या दहावीचे विद्यार्थी निकालाच्या काळजीतून मुक्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: राखी सावंतला बॉयफ्रेंडने गिफ्ट केले दुबईत अलिशान घर, समोर आली घराची पहिली झलक
VIDEO: साक्षी धोनीने चाहत्यांना दिला सुखद धक्का, घरी झालं नवीन पाहुणीचं आगमन, पाहून म्हणाल ‘क्युट’
VIDEO: गरिब मुलांनी कार्तिक आर्यनसाठी केलं असं काही की नेटकरी म्हणाले, ‘हे आहेत खरे चाहते’
१५ वर्षे विभक्त राहूनही जुळ्या बहिणींनी १० वीच्या परीक्षेत मिळवले सारखेच गुण, सर्वच झाले आश्चर्यचकित