Share

Shah Rukh Khan: वाढदिवस विशेष: महिला शाहरूखकडे इतक्या आकर्षित का होतात? समोर आली आश्चर्यकारक कारणे

बॉलिवूडचा किंग खान म्हटला जाणारा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. या अभिनेत्याचे देशातच नाही तर परदेशातही चाहते आहेत. त्याच वेळी, अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी वेडे झालेल्या आणि कोणत्याही थराला जाऊ शकणाऱ्या चाहत्यांची कमतरता नाही. शाहरुखच्या चाहत्यांची जेंडरनुसार विभागणी केली तर असे म्हणता येईल की अभिनेत्याची आवड मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आहे. Shah Rukh Khan, Craze, Romance, Fan Following

इतकंच नाही तर महिलांमध्येही या अभिनेत्याची क्रेझ इतकी आहे की, त्यांना त्यांच्या घरातील पुरुषांमध्ये शाहरुखची झलक पाहायची असते. शाहरुख खान रोमान्सचा बादशाह आहे. त्याचे जुने चित्रपट बघितले तर अभिनेत्याचा अभिनय आणि नायिकेला प्रपोज करण्याची त्याची पद्धत थेट हृदयाला भिडते. त्यामुळेच की काय अभिनेत्याच्या फॅन फॉलोअर्समध्ये मुलींचा आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

रिपोर्टनुसार, शाहरुखच्या फॅन फॉलोइंगमध्ये एकाच प्रकारच्या महिला नसून वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांचा समावेश आहे. त्यापैकी हाउस वाईफपासून ते वर्किंग वूमनपर्यंत सर्वांचा समावेश आहेत. जेव्हा अनेक महिलांना त्यांच्या हिंदी चित्रपटातील आवडत्या हिरोबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी बिनदिक्कतपणे थेट शाहरुख खानचेच नाव घेतले. या महिलांच्या प्रतिसादावरून त्यांची शाहरुखची क्रेझ स्पष्टपणे दिसून येते.

शाहरुखची क्रेझ मुलींमध्ये इतकी पाहायला मिळते की स्त्रिया आपल्या घरातील पुरुषांमध्येही शाहरुखची झलक शोधू लागतात. मध्यमवर्गीयांपासून ते श्रीमंत महिलांपर्यंत सर्व महिलांशी झालेल्या संभाषणातून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे मुले आणि पुरुष पडद्यावर दिसणाऱ्या शाहरुख खानसारखे का असू शकत नाही.

एवढेच नाही तर शाहरुख खान महिलांसाठी आदर्श जोडीदार आहे. शाहरुखने आपल्या चित्रपटांमध्ये अशी व्यक्तिरेखा साकारली आहेत की, महिलांना त्याच्यासारखा जोडीदार हवा असतो. पडद्यावर शाहरुख आपल्या भावना मोकळेपणाने प्रेक्षकांसमोर ठेवायचा. शाहरुखने कधीही पडद्यावर आपल्या भावना लपवल्या नाहीत. तसेच तो नायिकेच्या भावनांबद्दल उदासीन असल्याचे दिसून आले नाही. त्याला महिलांचा आवडता अभिनेता बनवण्यामागे हेही कारण असू शकते.

जर आपण तरुणींबद्दल बोललो, तर त्यांना शाहरुखसारखा लाइफ पार्टनर नको असतो, पण हो, त्यांना अभिनेत्याप्रमाणे तो यशस्वी असण्याचे स्वप्न असते. शाहरुख खान आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याचा खडतर प्रवासही अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

महत्वाच्या बातम्या-
शाहरुख खानचा ‘मॉन्स्टर’ लुक आला समोर , बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
shivsena : शिंदेंचं सरकार कोसळणार आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार; सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर मोठी अपडेट
Bollywood Actress: शाहरुख खान आणि सेक्सच विकले जाते, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या विधानाने उडाली होती खळबळ

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now