Share

पाकिस्तानातील ट्रकांवर सिद्धू मुसेवालाचे फोटो का लावले आहेत? कारण वाचून डोळे भरून येतील

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या(Siddhu Moosewala) निधनाच्या धक्क्यातून चाहते अद्याप सावरलेले नाहीत. असा एकही दिवस जात नाही जेव्हा सिद्धूच्या चाहत्यांना त्याची आठवण येत नसेल. प्रसिद्ध गायकाचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहेत.(why-are-sidhu-musewalas-photos-on-trucks-in-pakistan)

अलीकडेच, त्याच्या पाकिस्तानी(Pakistani) चाहत्यांनी त्याला एका खास पद्धतीने आदरांजली वाहिली आहे, जे पाहून सर्वांचे डोळे ओले झाले आहेत. 29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

11 जून रोजी सिद्धू मुसेवालाचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने देशासह विदेशातही चाहत्यांनी त्यांची आठवण काढली. आता पाकिस्तानातील ट्रकचालकांनीही सिद्धू मुसेवालाला श्रद्धांजली वाहिली आहे. ते पाहून तुमचे हृदय विरघळेल.

सिद्धू मुसेवालाने या जगाचा निरोप घेतल्यापासून त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्याच्या जाण्यानंतर चाहते आपापल्या परीने त्याची आठवण काढत आहेत. आपल्या शेजारी देश पाकिस्तानमध्येही असेच काही चाहते आहेत, ज्यांनी सिद्धू मुसेवालाची खास आठवण काढली आहे. कुणी ट्रकवर त्याचे पोस्टर लावले आहेत तर कुणी दुचाकीवर फोटो लावले आहेत.

https://twitter.com/iffiViews/status/1536369112321912835?s=20&t=kYPdW_PmCvfdkzXMby36Qg

ट्रकच्या(Truck) पोस्टरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या ट्रकच्या मागे सिद्धू मूसवालाचे पोस्टर बनवत आहे. यानंतर तो साफ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच खूप लोकप्रिय झाला आहे. हे बघून चाहते भावूक होत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर(Social media) शेअर करताना एका यूजरने लिहिले की, ‘कदाचित सिद्धू मुसेवाला हा पहिला भारतीय पंजाबी गायक असेल ज्याने पाकिस्तानच्या ट्रकवर जागा मिळवली. पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी ट्रक्सवर फोटो असणे म्हणजे तुम्ही लोकांच्या हृदयात आहात.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now