नुकताच देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या चार राज्यात भाजप आघाडीवर राहिली तर पंजाब राज्य आम आदमी पक्षाच्या हाती लागले. पंजाबमध्ये आप आघाडीवर असल्याने चर्चेला उधाण आले. यातच आता या मुद्द्यावरून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्याकाळी केलेले एक भाकीत प्रचंड व्हायरल होत आहे.
सध्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. पाचपैकी चार राज्यात भाजपने आपला झेंडा फडकविला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. तर पंजाब राज्यात आम आदमी पक्षाने आपली सत्ता मिळवली आहे. आपच्या या विजयाचा तोटा नेमका भाजपला झाला की काँग्रेसला याबद्दल सध्या समाज माध्यमांवर चर्चा होत आहे.
याविषयी आता भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पत्रकार निखिल वागळे यांच्यासोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंडे यांनी आम आदमी पक्षाच्या यशाबद्दल काही भाकीत केले होते. त्यांनी केलेले त्यावेळेचे भाकीत आता खरं झाल्याचं बोलले जात आहे.
निखिल वागळे यांनी आम आदमी पक्षामुळे भाजपचे नुकसान होणार का असा प्रश्न गोपीनाथ मुंडे यांना केला होता. त्यावेळी मुंडे यांनी उत्तर दिले की, आपचा फायदा भाजपालाही झालाय. भाजपच्या जागा 16 वरुन 32 झाल्या. भाजपच्या मतात दुप्पट वाढ झालेली आहे.
तसेच म्हणाले, आता आपचा त्रास भाजपाला काही होणार नाही, आपचा ताप काँग्रेसला होईल. आपचा ताप आम्हाला नाही, काँग्रेसला होणार. काँग्रेस जिथं कमी होईल तिथं आप वाढेल. ते आम्हाला घटवू शकणार नाहीत, असे गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यामुळे सध्या झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता मुंडे यांचे हे भाकीत खरं ठरलं असल्याचं बोललं जात आहे.
https://twitter.com/Manikmundhe/status/1502463819154857984?t=KNYMcnS6I7XxUXJJks35Bw&s=19
पंजाबमधील आप चा विजय हा ऐतिहासिक आहे. कॉंग्रेस नको असलेले मात्र भाजपला पर्याय शोधणारे मतदार आता हळूहळू आपकडे वळत असल्याचे चित्र या निकालातून समोर आले आहे. पंजाबमधील राजकारणामुळे आता देश पातळीवरील राजकारणच बदलून जाणार आहे, अशी देखील चर्चा होत आहे.