मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्ते सक्रीय झाले असून, मुंबईसह काही ठिकाणी अजानावेळी हनुमान चालीसा लावण्यात आली. मात्र, दुसरीकडे माहीम, मुंब्रा, भिवंडी मालेगाव, पुणेसह अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान झाल्याची माहिती मिळाली असून, मशिदींबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे नाशिकमध्ये सकाळपासूनच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मनसेच्या २९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी काही जणांना तडीपारीच्या नोटिसा बजावत कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे आता सोशल मिडियावर राज ठाकरे ट्रोल होतं आहेत.
जाणून घेऊया राज ठाकरेच्या या नव्या भूमिकेवर राज्यातली जनता काय म्हणतेय? ? अटक झालेल्या तरुणांच्या भवितव्याचं काय होणार? नोकऱ्या गेल्या तर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोण उचलणार? असे सवाल आता सोशल मीडियावर केले जात आहे. यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळच वळण लागलेलं पाहायला मिळत आहे.
‘स्वतः साहेब असतील का मैदानात, जर भोंगे उतरवायची वेळ आली तर….की फक्त ऑर्डर देतील ऑफिस,ट्विटर वरून…अन् आम्ही काढत फिरायचे अन् केसेस घ्यायच्या,अन् स्वतःच्या घरच्यांना जामिना साठी वणवण करत लावायची…आणि साहेब मस्त एसी मधून फक्त हुकूम देणार?? ..अस नसावे ही अपेक्षा…,’ असं या युजरने म्हंटले आहे.
दरम्यान, राज यांनी मंगळवारी सायंकाळी जारी केलेल्या पत्रकामध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना मशिदीवरील सर्व भोंगे अनधिकृत आहेत. सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या कशा देते. त्यांना परवानगी देणार असाल तर देवळांनाही परवानगी द्यायलाच हवी, असं म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे, रस्त्यावर नमाजसाठी बसणे, वाहतूक कोंडी करणे कोणत्या धर्मात बसते. भोंग्यांचाही विषय हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. पण या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं ते राज ठाकरेंना का नाही जमलं? गुन्हा दाखल झाल्यावर चर्चांना उधाण
भोंग्याचे ‘राज’कारण : राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा ‘तो’ जुना व्हिडीओ ट्वीट; पहा व्हिडिओ
जिथं अनाज तिथं जय हनुमान! …म्हणून मनसेने मानले मुस्लिमांचे जाहीर आभार; वाचा नेमकं काय घडलं
मनसैनिकांनी केले राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, राज्यात ठिकठिकाणी पहाटे हनुमान चालिसाचे पठण