मराठी चित्रपट, वेबसीरिजच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप उमटविणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचे नाव घेतले जाते. मात्र, सध्या ती ऐन गणपती बाप्पांच्या आगमनाच्या वेळीच लोकांच्या टीकेची धनी होताना दिसत आहे. नेमकं तिनं असं काय केलं जाणून घेऊ.
सध्या सगळीकडे बाप्पाचा जल्लोष सुरु आहे. मराठी सेलिब्रेटींनी मोठ्या उत्साहात बाप्पाची आराधना करत प्राणप्रतिष्ठा केली आहे. यात केवळ मराठीच सेलिब्रेटींचा समावेश नाहीतर बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी देखील सहभाग घेतला आहे.
या सगळ्यात सईची सोशल मीडियावर वेगळ्याच कारणासाठी चर्चा सुरु झाली आहे. सईवर टीका केली जात आहे. ही टीका शेफाली वैद्य यांनी केली आहे. सईवर टीका करण्याचं कारण म्हणजे, तिने टिकली न लावताच गणरायाची मुर्ती हातात घेतली.
त्यावरून शेफाली वैद्य यांनी नाराज होऊन सईवर टीका केली आहे. शेफाली वैद्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कोणती महाराष्ट्रायीन स्त्री ही टिकली न लावता गणरायाला घरी घेऊन येईल. त्या ट्विटर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काहींनी शेफाली यांना उलटे प्रश्नही विचारले आहेत.
एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रात सईचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्यात तिनं हातात गणरायाची मुर्ती घेतली आहे. त्या फोटोंवर शेफाली वैद्य यांनी आक्षेप घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणती महाराष्ट्रयीन स्त्री ही टिकली न लावता गणरायाला घरी घेऊन येईल?
Which Maharashtrian woman brings home Shri Ganesh Murti without a bindi? @RelianceDigital? #nobindinobusiness https://t.co/GlWpAh6YI0
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) August 31, 2022
सईवर टीका करत असताना नेटकऱ्यांनी शेफाली वैद्य यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. असं काय घडलं की तुम्ही अभिनेत्रीला एवढं धारेवर धरता आहात. अशा आशयाचे प्रश्न त्यांना विचारण्यास सुरुवात झाली आहे. चाहत्यांनी वैद्य यांच्यावरच निशाणा साधला आहे.
शेफाली वैद्य यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, त्या सोशल मीडियावर आपल्या परखड भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्या लेखिका, प्रवक्ता, उद्योजिका आहेत. याशिवाय एका पक्षाशी संबंधित असून त्या पक्षाचा प्रचार आणि प्रसाराची भूमिका त्या पार पाडत असल्याचे दिसून आल्या.